Bell Bottom Box Office Prediction | लॉकडाऊननंतर थिएटरमध्ये पहिल्यांदाच प्रदर्शित होणार चित्रपट, किती कमाई करू शकतो अक्षयचा ‘बेलबॉटम’?

| Updated on: Aug 19, 2021 | 11:14 AM

बिग बजेट बॉलिवूड चित्रपट बऱ्याच दिवसांनी आज (19 ऑगस्ट) चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. हा अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ (Bell Bottom) चित्रपट आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. ‘बेल बॉटम’च्या आधीही अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

Bell Bottom Box Office Prediction | लॉकडाऊननंतर थिएटरमध्ये पहिल्यांदाच प्रदर्शित होणार चित्रपट, किती कमाई करू शकतो अक्षयचा ‘बेलबॉटम’?
बेल बॉटम
Follow us on

मुंबई : बिग बजेट बॉलिवूड चित्रपट बऱ्याच दिवसांनी आज (19 ऑगस्ट) चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. हा अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ (Bell Bottom) चित्रपट आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. ‘बेल बॉटम’च्या आधीही अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. परंतु, त्यांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केले गेले. या चित्रपटांमध्ये ‘भुज’, ‘शेरशाह’, ‘मिमी’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असती. आता ‘बेल बॉटम’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि चाहत्यांना त्यातून मोठ्या आशा आहेत.

सध्या अभिनेता अक्षय कुमार ‘बेल बॉटम’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. लारा दत्ता, हुमा कुरेशी आणि वाणी कपूर या चित्रपटात अक्षयसोबत महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. अनेक चित्रपटगृहे उघडल्यामुळे चित्रपटाला खूप फायदा होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया, हा चित्रपट पहिल्याच दिवशी किती कोटी कमवू शकतो…

बॉक्स ऑफिसचा अंदाज

अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला अनेक चित्रपटगृहे उघडण्याचा लाभ मिळू शकतो. मात्र, अजूनही अनेक राज्यांमध्ये सिनेमा हॉल पूर्णपणे उघडलेले नाहीत. कोरोना महामारी लक्षात घेता, अजूनही अनेक चित्रपटगृहे न उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व गोष्टी असूनही, जर अहवालांवर विश्वास ठेवला गेला तर चित्रपट पहिल्या दिवशी 5-7 कोटींचा गल्ला कमावू शकतो.

आठवड्याच्या शेवटी होऊ शकतो लाभ!

अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट रक्षाबंधनाच्या सणाला रिलीज होणार आहे. लाँग वीकेंडचा या चित्रपटाला मोठा फायदा होऊ शकतो. वीकेंडपर्यंत चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन वाढू शकते.

कशी आहे चित्रपटाची कथा?

नवी दिल्लीहून श्रीनगरला जाणारे एक विमान दहशतवाद्यांकडून हायजॅक केले जाते. त्यानंतर दहशतवाद्यांकडून हे विमान अमृतसर विमानतळावर उतरवले जाते. विमान हायजॅक झाल्याचे कळाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावतात. यावेळी ‘रॉ’च्या अधिकाऱ्याची भूमिका साकारणाऱ्या आदिल हुसैन यांच्याकडून या कामगिरीसाठी अंशुल मल्होत्रा (अक्षय कुमार) या अधिकाऱ्याची निवड केली जाते. अंशुल मल्होत्राचे कोड नेम बेल बॉटम असे आहे.

यानंतर चित्रपटात अंशुल मल्होत्रा अपहरण झालेल्या प्रवाशांची कशाप्रकारे सुटका करतो, याचा थरारक प्रवास पाहायला मिळतो. या चित्रपटात थरात आणि फॅमिली ड्रामा असे दोन प्लॉट समांतररित्या सुरु असताना दिसतात. या चित्रपटात अक्षय कुमारसह आदिल हुसैन, हुमा कुरेशी, लारा दत्ता, वाणी कपूर, हुमा कुरेशी आणि अनिरुद्ध दवे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा :

विकी कौशल-कतरिना कैफ यांचा साखरपुडा झाला? पाहा अभिनेत्रीची टीम काय म्हणाली…

अक्षय कुमारचा हिट परफॉर्मन्स, लारा दत्ता आणि आदिल हुसैनच्या अभिनयाची वाहवा