मुंबई : बाॅलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याचा 2019 मध्ये ड्रीम गर्ल हा चित्रपट रिलीज झाला होता. विशेष म्हणजे हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हीट ठरला. या चित्रपटामध्ये आयुष्मानने धडाकेबाज अभिनय केला. आता लवकरच चाहत्यांच्या भेटीला ड्रीम गर्ल 2 येणार आहे. हा चित्रपट 29 जून 2023 ला रिलीज होणार होता. मात्र, नुकताच या चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये मोठा बदल करण्यात आलाय. आता चाहत्यांना चित्रपट बघण्यासाठी थोडी अजून वाट पाहावी लागणार आहे.
ड्रीम गर्ल 2 मध्ये काही मोठे बदल करण्यात आले आहेत. या चित्रपटात ड्रीम गर्लच्या पहिल्या भागाप्रमाणेच अभिनेता आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत आहे. परंतू नुसरत भरुचा ऐवजी यावेळी चंकी पांडेच्या लेकीला एकता कपूरने संधी दिलीये.
ड्रीम गर्लच्या पहिल्या भागामध्ये नुसरत भरुचा हिने जबरदस्त अभिनय केला होता. नुसरत भरुचाच्या जागी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश असेल अशी एक चर्चा होती. मात्र, शेवटी अनन्या पांडेचे नाव पुढे आले आणि ती नुसरत भरुचाच्या जागी यावेळी चित्रपटात दिसणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनन्या पांडे हिचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जात आहेत. आता ड्रीम गर्ल 2 मध्ये काय धमाका होणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. ड्रीम गर्ल 2 च्या रिलीज डेटमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.
साजिद नाडियाडवाला याने एकता कपूरला चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याची विनंती केली होती. कारण 29 जून 2023 ला साजिदचा चित्रपट सत्यप्रेम की कथा रिलीज होतोय. साजिदची विनंती मान्य करून एकता कपूरने रिलीज डेट पुढे ढकलली आहे.
आता ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट 7 जुलै 2023 ला प्रेक्षकांच्या भेटाला येणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. काही दिवसांपासून या चित्रपटाचे टीझरही रिलीज झाले आहे. या चित्रपटात अनन्या आणि आयुष्मानसोबत अन्नू कपूर आणि परेश रावल देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत.