मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आज तिचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुष्मिता सेनला चाहते मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शुभेच्छा देताना दिसत आहेत. सुष्मिता देखील सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते आणि आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. सुष्मिता नेहमीच तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. आज जरी सुष्मिताचा 47 वा वाढदिवस असला तरीही एका 25 वर्षांच्या मुलीसारखी सुष्मिताचा दिसते.
बाॅलिवूडमधील अनेक स्टार्सने सुष्मिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड अर्थात रोहमन शॉल याने देखील सुष्मिताला वाढदिवसाच्या खास पध्दतीने शुभेच्छा दिल्या आहेत. इतकेच नाही तर सुष्मिताचा एक फोटोही त्याने शेअर केला आहे.
रोहमन शाॅलने जो सुष्मिताचा फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये सुष्मिताचा लूक एकदम जबरदस्त दिसतोय. इतकेच नाही तर 47 असे त्या फोटोवर लिहून पुढे एक दिल देखील दिला आहे. आता रोहमनची हिच पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल जवळपास दोन वर्ष ऐकमेकांना डेट करत होते. या दोघांची बाँडिंग अजूनही खूप चांगली आहे. काही गोष्टींमुळे दोघांमध्ये बिनसले. परंतू आजही हे दोघे खूप चांगले मित्र नक्कीच आहेत. नाते संपल्यानंतर रोहमनने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती.
रोहमन शॉल हा सुरूवातीपासूनच सुष्मिता सेनचा खूप मोठा फॅन होता. काही दिवसांपूर्वी ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तेंव्हापासून अनेक चर्चांना उधाण आले. इतकेच नव्हे तर सुष्मिता आणि ललित मोदी लग्न करणार असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत.