मुंबई : 80 च्या दशकातील ‘लव्ह स्टोरी‘ (Love Story) या आपल्या पहिल्या चित्रपटाद्वारे रातोरात स्टार बनलेल्या अभिनेत्री विजयता पंडितचा (Vijayta Pandit Birthday) आज वाढदिवस आहे. विजयता पंडित बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत, मात्र 40 वर्षांनंतर त्यांनी पुन्हा चित्रपट पडद्यावर झळकण्याची तयारी केली आहे. विजया पंडित प्रसिद्ध संगीतकार जोडी जतिन पंडित आणि ललित पंडित यांची बहिण आणि दिवंगत संगीतकार आणि गायक आदेश श्रीवास्तव यांच्या पत्नी आहेत.
जेव्हा विजयता यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं, तेव्हा त्यांचे सहकलाकार कुमार गौरवसोबतच्या (Kumar Gaurav) त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. या जोडीची चर्चा त्यांच्या अभिनयाबद्दल तर होतीच, मात्र बॉलिवूड कॉरिडॉरमध्ये त्यांच्या अफेअरबद्दलही अधिक चर्चा होत होती. कुमार गौरव हे ज्येष्ठ अभिनेते राजेंद्र कुमार यांचा मुलगा होते.
कुमार गौरवसोबत अफेअरच्या चर्चेनंतर करिअर झाले उद्ध्वस्त
राजेंद्र कुमार यांनी आपल्या मुलाला लॉन्च करण्यासाठी ‘लव्ह स्टोरी’ चित्रपटाची निर्मिती केली होती आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर कुमार गौरव आणि विजया पंडित यांच्यातील संबंधांविषयी चर्चा झाली, जे राजेंद्र कुमार यांना आवडलं नाही. राजेंद्र कुमार यांनी सून म्हणून विजयता यांना स्वीकारलं नाही असा दावा काही अहवालांमध्ये केला जातो. त्यांनी कुमार गौरवसाठी विजयला नाकारलं होतं. ही फक्त चर्चा आहे की यात काही सत्य आहे हे अजूनही समोर आलेलं नाही.
अनेक वर्षांनंतर, विजयता यांनी त्यांच्या आणि कुमार गौरवच्या नात्याबद्दल मौन तोडलं आणि ‘लव्ह स्टोरी’ नंतर कुमार गौरवसोबत चित्रपट न करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांना पश्चात्ताप झाल्याचंही उघड झालं. TOI ला दिलेल्या मुलाखतीत, स्वत: आणि कुमार गौरव यांच्यातील नातेसंबंधात विजयता म्हणाल्या होत्या – पाहा, माझा मुलगा आता मोठा झाला आहे. जे झालं ते निघून गेलं आणि मला त्याबद्दल आता बोलायचं नाही.
यासोबतच विजयता यांनी ‘लव्ह स्टोरी’ नंतर कुमार गौरवसोबत चित्रपट न करण्याबद्दल म्हटलं होतं – ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी खंत होती आणि मी त्यानंतर चित्रपट साईन न करण्याचं ठरवलं याला कारण खूप वैयक्तिक होतं. मला असं वाटतं की जर मी काम करणं सुरू ठेवलं असतं तर मी आणखी नाव आणि प्रसिद्धी मिळवू शकले असते. मात्र, मला ऑफर झालेल्या बहुतेक चित्रपटांमध्ये कुमार गौरव माझ्याबरोबर होता.
संबंधित बातम्या
साहिरचा बंडखोरपणा आणि माडगुळकरांच्या शैलीचा मिलाफ; सिन्नरकर कसे घडले वाचा!