“द काश्मीर फाईल्स’ सिनेमा टॅक्स फ्री करा”, भाजपची विधीमंडळ अधिवेशनात मागणी

| Updated on: Mar 14, 2022 | 2:49 PM

'द काश्मीर फाईल्स'सिनेमा महाराष्ट्रात करमुक्त करावा, अशी मागणी विधीमंडळात करण्यात आली.

द काश्मीर फाईल्स सिनेमा टॅक्स फ्री करा, भाजपची विधीमंडळ अधिवेशनात मागणी
'द काश्मीर फाईल्स'-सिनेमा
Follow us on

मुंबई : ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashnir Files) हा सिनेमा बॉक्सऑफिससोबतच राजकीय वर्तुळातही गाजतोय. सध्या विधीमंडळ अधिवेशन सुरू आहे.या अधिवेशनादरम्यान भाजप आमदार प्रवीण दटके (Pravin Datake) यांनी ही मागणी केली. “द काश्मीर फाईल्स’ हा केवळ चित्रपट नसून सत्य परिस्थिती आहे.परंतू ही सत्य परिस्थिती काही सेक्युलर मंडळींना आवडलेली दिसत नाही. त्याचमुळे सिनेमाचे पोस्टर काढून टाकणे, सिनेमा सुरू असताना जाणिवपूर्वक आवाज बंद करणे,प्रेक्षकांना अडवणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे आमची मागणी आहे की चित्रपटाला विरोध करणाऱ्यांवर कारवाई करावी. बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मीरी पंडितांविषयी वेळोवेळी सहानुभूती दर्शवली आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की ‘द काश्मीर फाईल्स’सिनेमा महाराष्ट्रात करमुक्त करावा”, असं प्रवीण दटके म्हणाले आहेत.

‘द काश्मीर फाईल्स’ करमुक्त करा, भाजपची मागणी

‘द काश्मीर फाईल्स’सिनेमा महाराष्ट्रात करमुक्त करावा, अशी मागणी विधीमंडळात करण्यात आली. “द काश्मीर फाईल्स’ हा केवळ चित्रपट नसून सत्य परिस्थिती आहे.परंतू ही सत्य परिस्थिती काही सेक्युलर मंडळींना आवडलेली दिसत नाही. त्याचमुळे सिनेमाचे पोस्टर काढून टाकणे, सिनेमा सुरू असताना जाणिवपूर्वक आवाज बंद करणे,प्रेक्षकांना अडवणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे आमची मागणी आहे की चित्रपटाला विरोध करणाऱ्यांवर कारवाई करावी. बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मीरी पंडितांविषयी वेळोवेळी सहानुभूती दर्शवली आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की ‘द काश्मीर फाईल्स’सिनेमा महाराष्ट्रात करमुक्त करावा”, अशी मागणी प्रवीण दटके यांनी केली आहे.

अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असलेला ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात 1990 च्या नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा मांडण्यात आली आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ने बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली आहे. शनिवार आणि रविवारी या चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली आहे. अनुपम खेर, दर्शन कुमार आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट IMDb रेटिंग्जमध्येही अव्वल ठरला आहे.

संबंधित बातम्या

‘आता आपण फक्त दिवस मोजायचे’; प्रवीण तरडेंचा ‘सरसेनापती हंबीरराव’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

‘द काश्मीर फाईल्स’च्या पल्लवी जोशी, विवेक अग्निहोत्रींविरोधात काढण्यात आला फतवा

मोबाईलमध्ये शूट झालेला ‘पॉंडीचेरी’ सिनेमा आता ओटीटीवर, 18 मार्चपासून ‘प्लॅनेट मराठी’वर पाहता येणार