मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) रोज कोणत्या ना कोणत्या संकटात अडकत आहे. आता बृहमुंबई महानगरपालिकेने (BMC) सोनूला नोटीस पाठवली आहे. ज्यामध्ये त्याला हॉटेलमध्ये रुपांतरीत केलेल्या सहा मजली इमारतीचे पुन्हा निवासी इमारतीत रूपांतर करण्यास सांगितले आहे. सोनूला ही नोटीस 15 नोव्हेंबरला बजावण्यात आली होती. या इमारतीला हॉटेल बनवताना करण्यात आलेले बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
सोनूला बीएमसीने सरत्या वर्षाच्या सुरुवातीलाच त्याच्या जुहू हॉटेलचे निवासी इमारतीत रूपांतर करून बेकायदा बांधकाम हटवण्यास सांगितले होते. सोनूने मुंबई हायकोर्टात सांगितले होते की, मी बीएमसीच्या नियमांचे पालन करतो आणि स्वत: या इमारतीचे नूतनीकरण करून घेणार आहे.
सोनूने अद्याप या इमारतीचे नूतनीकरण केलेले नाही, असे बीएमसीने पाठवलेल्या या नोटीसमध्ये म्हटले आहे. नोटीसमध्ये बीएमसीने असेही म्हटले आहे की, ‘तुम्ही पहिल्या आणि सहाव्या मजल्यावरील कामे थांबवू असे सांगितले होते. तसेच त्याचा उपयोग रहिवाशांसाठी होणार असल्याचे सांगून काही महत्त्वाचे काम करून घेत असल्याचे देखील सांगितले होते. मात्र, बीएमसीच्या अधिकाऱ्याने 20 ऑक्टोबरला जागेची पाहणी केली असता आपण नियोजनानुसार काम सुरू केले नसल्याचे दिसून आले आहे.’
कार्यकर्ते गणेश कुसामुलू यांनी सोनू सूदविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी हॉटेलचे रुपांतर मुलींच्या वसतिगृहात केले आहे. बीएमसीने ही इमारत पाडावी. वृत्तानुसार, सोनूने बीएमसीला सांगितले होते की, ही इमारत निवासी मालमत्ता राहील आणि कोणतेही बेकायदेशीर बांधकाम केले जाणार नाही.
लॉकडाऊनमध्ये लोकांचा मसिहा बनून पुढे आलेला अभिनेता सोनू सूद अजूनही लोकांना मदत करण्यात गुंतलेला आहे. नुकताच तो साऊथचे कोरिओग्राफर शिव शंकर यांच्या मदतीसाठी धावून आला. शिवशंकर कोरोनाचे बळी ठरले होते. यादरम्यान सोनूने कुटुंबीयांच्या मदतीचा हात पुढे केला होता, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिवशंकर यांचा मृत्यू झाला.
Janhvi Kapoor | परी म्हणू की सुंदरा… जान्हवी कपूरच्या दिलखेचक अदा पाहून चाहतेही घायाळ!
Vicky-Katrina Wedding | ‘ऑल सेट फोर मॅरेज!’, विकी-कतरिनाच्या लग्नाआधी पापाराझींसाठी खास मेजवानी!