मुंबई: आपल्या सुमधूर आणि दैवी आवाजाने संगीताला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar Pass Away) यांचं आज निधन झालं. गेल्या २८ दिवसांचा त्यांचा संघर्ष आज संपला. लतादीदींच्या जाण्याने भारतीय संगीतसृष्टीतील एका पर्वाचा अंत झाला आहे. दिदींच्या निधनानंतर कलाक्षेत्रासह क्रीडा, सामाजिक, राजकीय, औद्योगिक, सर्वच क्षेत्रातून शोकाकुल भावना व्यक्त होत आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन दिदींच्या जाण्याने हळवे झाले आहेत. “शतकांचा आवाज हरपला, आता स्वर्गातही लतादिदींचा आवाज रुंजी घालेल”, अशा भावना अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी व्यक्त केल्या.
“दिदींच्या जाण्याने मला अतिव दु:ख होतंय. त्या आज आपल्याला सोडून निघून गेल्या आहेत. गेली 90 वर्ष त्यांनी भारतीयच नव्हे तर जगभरातील रसिकांची सेवा केली. त्या दिदी आज आपल्यात नाहीत. आता त्यांचा अवीट सूर स्वर्गातही रुंजी घालेल. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो”, अशी प्रार्थना आफल्या ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी केलीय.
अमिताभ बच्चन आणि लता मंगेशकर यांचं नात खास होतं. एकमेकांची सुख दु:ख ते नेहमी एकमेकांना सांगत. लदादिदींबद्दल अमिताभ बच्चन यांच्या मनात कमालीचा आदर होता. अनेक वेळा सार्वजनिक कार्यक्रमांमधून बिग बी यांच्या मनातला आदर दिसायचा. त्यांच्या एकमेकांसोबतच्या अनेक चांगल्या आठवणी आहेत.
जेव्हा लतादिदी आणि अमिताभ बच्चन यांनी सिलसिला गाणं गायलं!
सिलसिला चित्रपटातील ‘ये कहाँ आ गये हम’ हे गाणे… हे गाणं लता मंगेशकर यांनीच नाही तर अमिताभ बच्चन यांनीही गायलं होतं. अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजाने गाण्याची सुरुवात होते. यानंतर लतादिदींचा गोड आवाज कानावर पडतो. हे गाणं रेकॉर्ड होत असताना अमिताभ बच्चनसोबत नव्हते. हे गाणं आधी लता मंगेशकर यांच्यासोबत रेकॉर्ड करण्यात आले आणि नंतर उर्वरित भाग अमिताभ बच्चन यांच्यासोबत रेकॉर्ड करण्यात आला, असं स्वत: लतादिदींनी सांगितलं होतं.
जेव्हा लता मंगेशकर हे गाणं लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गात होत्या, तेव्हा त्यांनी अमिताभ बच्चन यांना नम्रपणे त्यांच्यासोबत हे गाणे गाण्यासाठी स्टेजवर आमंत्रित केलं. तेव्हा लता मंगेशकर म्हणाल्या होत्या की- ‘रेकॉर्डिंगनंतर ही पहिलीच वेळ आहे की मी अमितजींसोबत गातेय’
संबंधित बातम्या