मुंबई : अनुपम खेर हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files) चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अभिनेते प्रकाश राज यांनी द कश्मीर फाईल्स या चित्रपटाला बकवास म्हटल्यानंतर अनुपम खेर यांनी प्रकाश राज यांचा चांगलाच समाचार घेतला होता. द कश्मीर फाईल्स या चित्रपटामध्ये अनुपम खेर (Anupam Kher) हे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आले की, कश्मीरमध्ये कशाप्रकारे काश्मिरी पंडितांवर अन्याय आणि अत्याचार झाले. मुळात म्हणजे द कश्मीर फाईल्स हा चित्रपट (Movie) रिलीज झाल्यानंतर दोन ग्रुप झाले. काहीजण या चित्रपटाचे समर्थन करताना दिसले तर काहीजणांनी या चित्रपटाला विरोध केला.
द कश्मीर फाईल्स हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी रिलीज झाला. आता या चित्रपटाला रिलीज होऊन बरेच दिवस झाले असूनही या चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तुफान कमाई केली. विशेष म्हणजे ज्यावेळी बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जात होते, त्यावेळी चित्रपटाने धमाका केला.
अनेकांनी द कश्मीर फाईल्स हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनुपम खेर यांच्या अभिनयाचे काैतुक केले. द कश्मीर फाईल्स या चित्रपटावर अनेकांनी टिकाही केली. मात्र, काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्री यांनी दावा केला की, मी काश्मिरी पंडितांसोबत बोलून वस्तुस्थिती जाणून घेत चित्रपट तयार केलाय.
‘The Kashmir Files’ showed problems of Kashmiri pandits. We’ve earned a lot. We give charity to foreign orgs that are already rich. Now it’s important to give charity to our own people. I pledge Rs 5 lakhs for them: Anupam Kher at ‘Global Kashmiri Pandit Conclave’ event in Delhi pic.twitter.com/dI6vAy5dao
— ANI (@ANI) February 25, 2023
नुकताच अनुपम खेर यांनी 370 बद्दल मोठे विधान केले आहे. ग्लोबल काश्मिरी पंडित कॉन्क्लेव्हमध्ये अनुपम खेर यांनी द काश्मीर फाइल्सबद्दल सांगितले. अनुपम खेर म्हणाले की, आम्ही काश्मीरमध्ये राहणाऱ्या हिंदूंची स्थिती चित्रपटामध्ये दाखवली आहे. इतकेच नाही तर आम्ही चित्रपटामध्ये काश्मिरी पंडितांच्या समस्या देखील दाखवल्या.
पुढे अनुपम खेर म्हणाले की, आपण सर्वजण विदेशामध्ये मोठ्या देणग्या देता. मात्र, आता आपल्या जवळच्यांना मदत करण्याची वेळ आलीये. मी स्वत: पाच लाखांची मदत करणार असल्याचे देखील अनुपम खेर यांनी जाहिर केले. यावेळी बोलताना अनुपम खेर यांनी अत्यंत मोठ्या विषयाला देखील हात लावला.
अनुपम खेर म्हणाले, काश्मीरमधून कलम 370 हटवल्यापासून येथील परिस्थितीमध्ये खूप जास्त सुधारणा झालीये. मुळात म्हणजे द काश्मीर फाइल्स या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तूफान अशी कमाई नक्कीच केलीये. मात्र, काहींनी या चित्रपटावर टिका देखील केली.