Anupam Kher | कंगना राणावत म्हणाली होती देशात फक्त ‘खान’च पसंत, अनुपम खेर म्हणतात सर्वजण कला…

| Updated on: Feb 03, 2023 | 9:03 PM

शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या या चित्रपटाला फक्त देशामध्ये नाही तर विदेशामध्येही प्रेम मिळत आहे.

Anupam Kher | कंगना राणावत म्हणाली होती देशात फक्त खानच पसंत, अनुपम खेर म्हणतात सर्वजण कला...
Follow us on

मुंबई : अनुपम खेर हे सध्या त्यांच्या आगामी शिव शास्त्री बालबोआ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी अनुपम खेर (Anupam Kher) यांनी खूप जास्त मेहनत केलीये. चित्रपटातील आपल्या पात्रासाठी अनुपम खेर यांनी बॉडीमध्ये मोठा बदल केला आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर सुसाट अशी कामगिरी करतोय. सर्वत्र पठाण चित्रपटामुळे शाहरुख खान याचे काैतुक केले जात आहे. मात्र, यामध्ये फक्त अभिनेत्री कंगणा राणावत (Kangana Ranaut) ही अशी आहे जी पठाण चित्रपटाचे यश पाहून टीका करत आहे. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या या चित्रपटाला फक्त देशामध्ये नाही तर विदेशामध्येही प्रेम मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी एका महिलेने पठाण चित्रपटाचे काैतुक करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टला रिशेअर करत कंगना राणावत हिने मोठे विधान केले होते. यानंतर कंगना राणावत ही चर्चेत आली होती.

कंगनाने एका महिलेची पोस्ट रिशेअर करत म्हटले होते की, खरोखरच खूपच छान…या देशाला फक्त आणि फक्त खान आवडतात…सर्वच खान नेहमीच आवडतात…यासोबतच मुस्लीम अभिनेत्रींकडेही जास्त लक्ष दिले जात आहे…अशाप्रकारची पोस्ट कंगनाने रिशेअर केली होती.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अनुपम खेर यांनी याबद्दल मोठे विधान केले आहे. अनुपम खेर म्हणाले की, मला वाटते की कलेचे एक स्वतःचे वेगळे स्थान आहे आणि धर्माचेही स्वतःचे एक वेगळे स्थान नक्कीच आहे. धर्मामुळे कोणी चित्रपट पाहायला जात नाही… फक्त कलेमुळेच जाते… चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही मंदिर, मशिदी आणि गुरुद्वारांमध्ये जात नाहीत… तुम्ही जात आहात कारण तुमचा धर्म आहे…

अनुपम खेर यांनी एकप्रकारे कंगना राणावत हिला प्रतिउत्तर दिल्याचे दिसत आहे. बऱ्याच वर्षांनंतर कंगना राणावत ही ट्विटर वापस आलीये. ट्विटरने कंगना राणावत हिचे ट्विटर सस्पेंड केले होते. बंगाल हिंसाचारावरील ट्विट्सनंतर ही कारवाई करण्यात आली होती.