मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर हा त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आलाय. अर्जुन कपूर याचा कुत्ते आणि द लेडीकिलर हे दोन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 2019 मध्ये अर्जुन कपूर याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून अर्जुन कपूर याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर कायमचसोबत स्पाॅट होतात. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमुळे अर्जुन कपूर हा चर्चेत आलाय.
अर्जुन कपूर म्हणाला की, मला असे प्रोजेक्ट करायचे आहेत. जे करून मला आनंद मिळून शकेल. एक कलाकार म्हणून माझा चित्रपटामधील प्रवास हा खूप काही शिकणे आणि विकास करून घेण्याचा सुरूवातीपासूनच राहिला आहे.
मला दरवेळी चित्रपटांमध्ये वेगवेगळे अभिनय करून स्वत: ला अजून सिध्द करायचे आहे. मला माझे प्रदर्शन अजून चांगले करण्यावर भर द्यायचा आहे. मला असे वाटते की, चित्रपटांमध्ये मला एक रस्ता मिळाला आहे.
ऑनस्क्रीन नेमके काय करायचे हे मला समजले आहे. मी आता कशा चित्रपटांमध्ये काम करणार आहे, जिथे मला फक्त आनंद मिळणार आहे. मला अशा चित्रपटांमध्ये काम करण्याचे आहे. जिथे मी ऑनस्क्रीन माझे बेस्ट देऊ शकतो.
काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, मलायका अरोरा ही प्रेग्नेंट असून अर्जुन कपूरच्या बाळाची आई होणार आहे. मात्र, यानंतर अर्जुन कपूर याने संताप व्यक्त करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.