मुंबई : ऋतिक रोशन हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आलाय. सबा आझाद हिला ऋतिक हा डेट करतोय. सबा आणि ऋतिक कायमच स्पाॅट होतात. अनेकांना यांची जोडी अजिबातच आवड नाही. इतकेच नाहीतर मुलगी आणि वडिलांची सुंदर जोडी असल्याच्या कमेंट सोशल मीडियावर युजर्स करतात. सबा यावर सडेतोड उत्तर कायमच देते. नुकताच मुंबई विमानतळावर सबा आझाद, ऋतिक रोशन आणि ऋतिकची मुले रेहान आणि रिदान स्पाॅट झाले.
ऋतिक रोशन याच्या फॅमिलीसोबत सबा कायमच स्पाॅट होते. इतकेच नाहीतर ऋतिक रोशनच्या फॅमिलीसोबत काही दिवसांपूर्वी सबा डिनरसाठी देखील गेली होती. ऋतिक रोशन याची मुले रेहान आणि रिदान यांच्यासोबत देखील सबाचे चांगले रिलेशन आहे.
आता ऋतिक रोशन, सबा आझाद, रेहान आणि रिदान हे सर्व वॅकेशनसाठी विदेशात गेले आहेत. यावेळी पापाराझी हे ऋतिक रोशन याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. परंतू ऋतिक म्हणाला की, आम्हाला अगोदरच खूप उशीर झालायं, मी पळतो आता…
ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या फोटोला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते. सबा आझाद ही ऋतिक रोशनच्या अगोदर नसीरुद्दीन शाहचा मुलगा इमाद याला डेट करत होती. इतकेच नाहीतर हे दोघे लिव-इनमध्ये देखील राहात होते.
काही दिवसांपूर्वी सबा आझाद, ऋतिक रोशन आणि इमाद मुंबईच्या एका हाॅटेलबाहेर स्पाॅट झाले होते. यावेळी सबा हिने इमादची गळा भेट घेतली होती. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी सबाला ट्रोल देखील केले होते.