राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आलीये. मुंबईतील बांद्रा परिसरात त्यांच्यावर भर रस्त्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर त्यांना जवळच्या लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचे निधन झाले. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर एकच खळबळ बघायला मिळाली. हेच नाही तर सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांचे अत्यंत जवळचे संबंध असून सलमान खान याने लगेचच लीलावती रूग्णालयात धाव घेतली. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या.
बाबा सिद्दीकी यांच्यावर बिश्नोई गँगकडून गोळीबार करण्यात आला. तशी एक पोस्टही बिश्नोई गँगकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलीये. बिश्नोई गँगकडून गेल्या काही दिवसांपासून सलमान खान याला देखील मारण्याची धमकी देण्यात येतंय. सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आलीये. मात्र, बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर एक भीती निर्माण झालीये.
आता बाबा सिद्दीकी यांच्या अत्यंतदर्शनासाठी बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा पोहोचलाय. लोकांनी बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेर मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळतंय. सलमान खान बाबा सिद्दीकी यांच्या निवासस्थान पोहोचला आहे. अनेक बॉलिवूड कलाकार देखील बाबा सिद्दीकी यांच्या घरी दाखल झाले आहेत.
बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांची मैत्री अत्यंत खास होती. हेच नाही तर बाबा सिद्दीकी यांच्यावरील गोळीबारानंतर बिश्नोई गँगकडून एक पोस्ट ही सोशल मीडियावर शेअर करण्यात आलीये. या पोस्टमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, त्यांचे आणि बाबा सिद्दीकीचे काहीच देणे घेणे नाही. मात्र, जो दाऊद इब्राहिम आणि सलमान खान गँगला मदत करेल तो आमचा दुश्मन असेल.
14 एप्रिल रोजी पहाटे सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला. हैराण करणारे म्हणजे ज्यावेळी सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला, त्यावेळी सलमान खान हा घरात होता. त्यानंतर या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगकडून घेण्यात आली. पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच संबंधित आरोपींना पकडले देखील. आरोपींकडून काही हैराण करणारे खुलासे करण्यात आले.