मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा गेल्या काही दिवसांपासून हेरा फेरी 3 या चित्रपटामुळे चर्चेत आलाय. अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 ला नकार दिल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. नुकताच अभिनेता सलमान खान याने अक्षय कुमार याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार हा रडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अक्षयचे चाहते देखील भावूक झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होतोय.
अनेकांना हा प्रश्न पडलाय की, असे नेमके काय घडले आहे या व्हिडीओमध्ये चक्क खिलाडी कुमार हा रडतोय. विशेष म्हणजे अक्षय कुमार याला रडताना पाहुण सलमान खान हा देखील अत्यंत भावूक झाला आहे.
सलमान खान याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अक्षयची बहीण अलका भाटिया हिने त्याला रिअॅलिटी शोमध्ये एक ऑडिओ क्लिप पाठवली आहे. ज्यानंतर अक्षय कुमार हा भावूक होतो आणि रडायला लागतो.
इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडिओ शेअर करताना सलमान याने कॅप्शनमध्ये लिहिले की, मी नुकतेच असे काहीतरी पाहिले जे मी सर्वांसोबत शेअर करतोय. देव तुला आशीर्वाद देईल अक्की… हे पाहून खूप आनंद झाला… तंदुरुस्त राहा…काम करत राहा आणि देव तुझ्यासोबत असेल…
सलमान खान याने शेअर केलेल्या या व्हिडीओवर आता अक्षय कुमार याने देखील उत्तर दिले आहे. अक्षय कुमार याने लिहिले की, आपके संदेश से बहुत अच्छा लगा @beingsalmankhan…
आता सलमान खान याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. चाहते देखील या पोस्टवर कमेंट करताना दिसत आहेत. पहिल्यांदाच अक्षय कुमार हा भावूक होऊन रडताना दिसला आहे.