मुंबई : बाॅलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. त्याचे कारणही तेवढेच खास आहे. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. शाहरुख खान हा चार वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर होता. शाहरुख खान याचे चाहते त्याच्या पुनरागमनाची सतत वाट पाहात होते. शाहरुख खान याच्या झिरो या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र, हा चित्रपट फ्लाॅप गेला आणि शाहरुख खान याने बाॅलिवूडपासून लांब गेला. शाहरुख खान हा परत बाॅलिवूड चित्रपटांमध्ये दिसणार की नाही? हा प्रश्न सातत्याने चाहत्यांना सतावत होता. मात्र, पठाण या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान याने दणदणीत असे पुनरागमन केले आहे. शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाबद्दल सुरूवातीपासूनच चाहत्यांमध्ये मोठे क्रेझ बघायला मिळत होते. शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट अत्यंत बहुचर्चित ठरला. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये फक्त शाहरुख खान हाच नाही तर सलमान खान याचीही झलक चाहत्यांना बघायला मिळाली. पठाण चित्रपटामध्ये सलमान खान याचा केमिओ देखील होता.
पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच चर्चेत होता. पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यामुळे मोठ्या वादाला तोंड फुटले होते. या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणीही सातत्याने केली जात होती. परंतू चित्रपट रिलीज झाल्यानंतर या सर्व वादाचा फायदा चित्रपटाला झाल्याचे दिसले.
पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर शाहरुख खान किंवा चित्रपटाची टिम चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसली नाही. शाहरुख खान हा फक्त चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात होता. आताही शाहरुख खान हा त्याच्या सेशनमधून आपल्या चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दिसत आहे.
आज आस्क एसआरके सेशनमध्ये शाहरुख खान याने चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. यावेळी शाहरुख खान याला एका चाहत्याने विचारले की, सर तुमची सर्वात वाईट सवय कोणती आहे, जी तुम्हाला त्रासदायक असल्याचे वाटते? यावर शाहरुख खान याने खास रिप्लाय दिला आहे.
शाहरुख खान म्हणाला की, मी एखादी गोष्ट परत परत स्पष्ट करतो. यावेळी शाहरुख खान याने हे वाक्य आपल्या ट्विटमध्ये तीन वेळा लिहिले आहे आणि सांगितले आहे की, एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगण्याची त्याची सवय सर्वात वाईट सवय आहे आणि ही सवय त्याला त्रासदायक कायम वाटते.