मुंबई : चंकी पांडेची लेक अनन्या पांडे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अनन्याचा लाईगर हा चित्रपट रिलीज झालाय. मात्र, या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. या चित्रपटाच्या अपयशाचे खापर देखील अनन्या पांडेवरच फोडण्यात आले. एकता कपूरच्या ड्रीम गर्ल या चित्रपटात अनन्या दिसणार आहे. अनन्या आणि आयुष्मान खुराना हे दोघे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. करण जोहर याने अनन्या पांडेला बाॅलिवूडमध्ये लाॅन्च केले आहे.
अनन्या पांडे सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. त्याचे कारण म्हणजे अनन्या पांडेला भेटण्यासाठी खास तिचे काही चाहते इंदूरवरून आले होते. मात्र, अनन्या पांडे ही चाहत्यांसाठी अजिबात थांबली नाही आणि थेट गाडीकडे रवाना झाली.
हे चाहते अनन्या पांडेला फोटो घेण्यासाठी विनंती करत होते आणि आम्ही इंदूरवरून खास तुझ्यासाठी आलो आहोत. हे देखील सांगत होते. परंतू यांच्याकडे दुर्लक्ष करत अनन्या तेथून निघून गेली. याचाच व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून तिला ट्रोल केले जात आहे. एकाने सोशल मीडियावर कमेंट करत म्हटले की, तुम्ही या स्टार किड्सला इतक्या जास्त भाव काय देता? ही अनन्या पांडे सध्या खूप जास्त भाव खात आहे.
दुसऱ्याने लिहिले की, अरे तुमचे इतके जास्त वाईट दिवस आले का? हिच्यासोबत फोटो घेण्यासाठी तुम्ही थेट इंदूरवरून आला आहात. एका युजर्सने लिहिले की, ही शहनाज गिल थोडी आहे की, हिला चाहत्यांची किंमत असायला.
अनन्या पांडेच्या लाईगर या चित्रपटाची रिलीज होण्याच्या अगोदर खूप चर्चा होती. परंतू चित्रपट रिलीज झाल्यानंतर बाॅक्स आॅफिसवर या चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही.