जान्हवी कपूरच्या मोडक्या-तोडक्या हिंदीची आई श्रीदेवीकडूनच कॉपी, अन् एकच हश्या, वाचा पूर्ण किस्सा…

| Updated on: Mar 07, 2022 | 9:54 AM

जान्हवीच्या मोडक्या तोडक्या हिंदीवर श्रीदेवी हसली होती आणि तिच्या या हटके हिंदीची कॉपीही केली होती. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हश्या पिकला होता.

जान्हवी कपूरच्या मोडक्या-तोडक्या हिंदीची आई श्रीदेवीकडूनच कॉपी, अन् एकच हश्या, वाचा पूर्ण किस्सा...
श्रीदेवी, जान्हवी कपूर
Follow us on

आयेशा सय्यद, मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (janhavi Kapoor) तिच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असते. तिचे फोटो, तिच्या वैयक्तिक आयुष्यातील बाबींमुळे ती चर्चेत असते. तिने धडक रूहीं, गुंजन सक्सेना, गुडलक, घोस्ट स्टोरी, अंग्रेजी मिडियम, तख्त, बॉब्बे गर्ल, मिली, या सिनेमांमध्ये काम केलं आहे. शिवाय तिने अनेक ब्युटी प्रोडक्ट्सच्या जाहिरातीही केल्या आहेत. जान्हवी सुपरहिट अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी आहे. एकदा जान्हवीच्या मोडक्या तोडक्या हिंदीवर श्रीदेवी हसली होती आणि तिच्या या हटके हिंदीची कॉपीही केली होती. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हश्या पिकला होता.

जान्हवीच्या मोडक्या-तोडक्या हिंदीची श्रीदेवीकडून कॉपी

एकदा एका मासिकाकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यात श्रीदेवीसोबत जान्हवी कपूरसुद्धा उपस्थित होती. या प्रसंगी पत्रकारांनी जान्हवीला काही प्रश्न विचारले. जान्हवीनेही मोडक्या-तोडक्या हिंदीमध्ये त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली होती. त्यावर श्रीदेवीलाही हसू आवरेना. मग तिच्या या हटके हिंदीची कॉपीही केली आणि उपस्थितांमध्ये एकच हश्या पिकला. त्याचं जान्हवीलाही हसू आलं. त्यावर मग जान्हवी म्हणाली की, “मी अजून शाळेत शिकतेय. त्यामुळे हिंदी मला तितकीशी येत नाही.”

जान्हवी कपूरने मागितली माफी

आता खुद्द आईनेच आपल्या हिंदीची खिल्ली उडवली म्हटल्यावर जान्हवी थोडीशी ओशाळली. “मी अजून शाळेत शिकतेय. त्यामुळे हिंदी मला तितकीशी येत नाही. मला माफ करा…”, असं जान्हवी म्हणाली.

जान्हवीचं करिअर

जान्हवीने धडक रूहीं, गुंजन सक्सेना, गुडलक, घोस्ट स्टोरी, अंग्रेजी मिडियम, तख्त, बॉब्बे गर्ल, मिली, या सिनेमांमध्ये काम केलं आहे. शिवाय तिने अनेक ब्युटी प्रोडक्ट्सच्या जाहिरातीही केल्या आहेत. ती तिच्या इन्स्टाग्रामवरही चांगलीच अॅक्टिव्ह असते.

संबंधित बातम्या

Majhi Tujhi Reshim Gath : यश आणि नेहाची ‘ओम शांती ओम’ स्टाईल डेट, यश-नेहा प्रेमरंगी रंगले…

JHUND MOVIE PRIMIER SHOW | नागराज मंजुळेंच्या गुणवत्तेला प्रमाणपत्राची गरज नाही, नितीन गडकरींकडून मंजुळेंचं कौतुक

विवाहित असतानाही किरणच्या प्रेमात पडले अनुपम खेर; वाचा त्यांची लव्हस्टोरी!