दोन वर्षापूर्वीच भविष्यवाणी केली होती… पंजाबच्या हिंसाचारानंतर कंगना पुन्हा बोलली; ‘ती’ पोस्ट होतेय व्हायरल

| Updated on: Feb 25, 2023 | 11:20 AM

दोन वर्षापूर्वी शेतकरी बिलाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना कंगनाने दहशतवादी आणि खलिस्तांनी म्हटलं होतं. कंगनाच्या या पोस्टवर प्रचंड वाद झाला होता. तिच्या या विधानाविरोधात अनेक शहरात तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दोन वर्षापूर्वीच भविष्यवाणी केली होती... पंजाबच्या हिंसाचारानंतर कंगना पुन्हा बोलली; ती पोस्ट होतेय व्हायरल
Kangana Ranaut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : पंजाबच्या अमृतसरमध्ये हिंसाचार भडकला आहे. अजनाला येथे तर पोलीस ठाण्यावर हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पंजाबमध्ये या हिंसाचारामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बॉलिवूड क्वीन कंगना रनौतने एक मोठं विधान केलं आहे. दोन वर्षापूर्वीच मी याबाबतचं भाकीत केलं होतं. पण तेव्हा माझ्या कारवर हल्ला करण्यात आला होता, असं कंगनाने म्हटलं आहे. कंगनाने फेसबुकवर पोस्ट करून आपलं म्हणणं मांडलं आहे. तसेच तिच्या जुन्या ट्विटचा दाखलाही तिने दिला आहे.

वारिस पंजाब दे या संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांच्या समर्थकांनी अजनाला पोलीस ठाण्यावर हल्ला करून पोलीस ठाणे ताब्यात घेतलं आहे. पंजाबमधील परिस्थिती अत्यंत तणावाची बनली आहे. त्यामुळे देशभरातील नागरिक हादरून गेले आहेत. त्यातच कंगनाने फेसबुक पोस्ट करून आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवली आहे. आपल्या भाकिताचीही आठवण करून दिली आहे. तसेच खलिस्तानी शिखांना सल्लाही दिला आहे.

हे सुद्धा वाचा

पोस्टमध्ये काय म्हटलं?

पंजाबमध्ये आज जे काही होत आहे. त्याची भविष्यवाणी मी दोन वर्षांपूर्वीच केली होती. पण माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले. माझ्या कारवर पंजाबमध्ये हल्ला करण्यात आला. असं असलं तरी मी जे भाकीत वर्तवलं होतं तेच झालं. आता गैर खलिस्तांनी शिखांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आली आहे, असं कंगनाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दोन वर्षापूर्वीचं भाकीत काय?

दोन वर्षापूर्वी शेतकरी बिलाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना कंगनाने दहशतवादी आणि खलिस्तांनी म्हटलं होतं. कंगनाच्या या पोस्टवर प्रचंड वाद झाला होता. तिच्या या विधानाविरोधात अनेक शहरात तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या वादानंतर कंगना पंजाबला पोहोचली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी तिच्या कारला घेराव घातला होता.

त्यानंतर तिने इन्स्टाग्राम पोस्टमधून या घटनेवर भाष्य केलं होतं. मी पंजाबमध्ये प्रवेश करताच माझ्या कारला घेरलं गेलं. कारवर हल्ला करण्यात आला. आता अमृतसरच्या अजनाला पोलीस ठाण्यावर हल्ला करण्यात आळा आहे. त्यामुळे कंगना दोन वर्षापूर्वीचं आपलं भाकीत सांगितलं आहे.