Kangana Ranaut | कंगना राणावत हिने केला गंभीर आरोप, सांगितले बाॅलिवूडमधील काळे सत्य

| Updated on: Feb 27, 2023 | 3:56 PM

कंगना राणावत हिच्या निशाण्यावर कायमच बाॅलिवूडचे काही कलाकार असतात. विशेष म्हणजे कंगना ही सोशल मीडियावरही सक्रिय आहे. नुकताच कंगना राणावत हिने खास पोस्ट शेअर केलीये, ज्यामुळे ती सध्या चर्चेत आहे.

Kangana Ranaut | कंगना राणावत हिने केला गंभीर आरोप, सांगितले बाॅलिवूडमधील काळे सत्य
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) ही तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक तिच्या विधानांमुळे चर्चेत असते. इतकेच नाही तर कंगना तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील चाहत्यांना अपडेट देत असते. कंगना राणावत ही तिच्या इमर्जन्सी या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये कंगना राणावत ही माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. कंगना राणावत हिच्या निशाण्यावर कायमच बाॅलिवूडचे काही कलाकार असतात. विशेष म्हणजे कंगना ही सोशल मीडियावरही सक्रिय आहे. नुकताच कंगना राणावत हिने खास पोस्ट शेअर केलीये, ज्यामुळे ती सध्या चर्चेत आहे.

नुकताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कंगना राणावत हिने बाॅलिवूड माफियांवर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे कंगना राणावत हिने तब्बल तीन ट्विट केले आहेत. या ट्विटवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. यादरम्यान कंगना राणावत हिने मोठा खुलासा देखील केला आहे.

कंगना राणावत हिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, अभिनेत्याने फोन केल्यानंतर रात्री त्याच्या रूममध्ये जाणाऱ्या अभिनेत्रींपैकी मी नाहीये, यामुळे मला अनेकदा घमंडी म्हटले जाते. पुढे कंगना राणावत हिने लिहिले की, भिखारी चित्रपट माफिया माझ्या एटीट्यूडला घमंड समजतात.

पुढे कंगनाने लिहिले, त्यांना मी घमंडी वाटण्याचे काही कारणे देखील आहेत. मी कधीही त्यांच्या मुलींच्या लग्नात डान्स केला नाहीये किंवा दात काढत बसले नाहीये. यामुळे त्यांना मी पागल वाटते आणि त्यांनी मला जेलमध्ये टाकण्याचा देखील प्रयत्न केला आहे. एका दुसऱ्या पोस्टमध्ये कंगना राणावत हिने तिच्या आईचा एक फोटो शेअर केला आहे.

कंगनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिची आई ही शेतामध्ये काम करताना दिसत आहे. कंगनाने हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ही माझी आई आहे…ती रोज 7-8 तास शेतामध्ये काम करते. अनेकदा लोक घरी येऊन म्हणतात की, आम्हाला कंगनाच्या आईला भेटायचे आहे. मात्र, त्यापूर्वीच आईने त्यांना चहा पाणी दिलेले असते.

आता कंगना राणावत हिची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे कंगनाच्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. काही दिवसांपूर्वी कंगना राणावत हिने रणबीर कपूर याच्या विरोधात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.