मुंबई : बाॅलिवूडची अभिनेत्री करिश्मा कपूर ही गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूडच्या चित्रपटांपासून दूर आहे. 90 चा एक काळ करिश्मा कपूर हिने गाजवला आहे. करिश्माने तिच्या बाॅलिवूड करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. करिश्मा काही वर्षांपूर्वी तिच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आली होती. करिश्मा हिने 2006 मध्ये बिझनेस मॅन संजय कपूर याच्याशी लग्न गाठ बांधली होती. परंतू फार कमी काळामध्येच संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांच्यामध्ये हटके उडाले.
इतकेच नाहीतर करिश्मा कपूर हिने संजय कपूर यांच्यासोबतच त्याच्या कुटुंबावरही गंभीर आरोप केले होते. करिश्माचे आरोप ऐकल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. करिश्मा आणि संजय यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
करिश्मा आणि संजय कपूर यांचा घटस्फोट 2016 मध्ये झाला. करिश्माचे दोन्ही मुले तिच्यासोबतच सध्या राहतात. एका मुलाखतीमध्ये करिश्मा कपूर हिने सांगितले होते की, संजय कपूर तिला कशाप्रकारे आणि कोणत्या कारणासाठी मारहाण करायचा.
करिश्मा म्हणाली होती की, मी जेंव्हा प्रेग्नेंट होते त्यावेळी संजय कपूर हा माझ्यासाठी एक ड्रेस घेऊन आला होता. मात्र, तो ड्रेस मला फिट बसत नव्हता. त्यानंतर संजय कपूर याने त्याच्या आईला बोलावून मला चापट मारण्यास सांगितले होते.
करिश्मा कपूर हिच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूर याने प्रिया सचदेव हिच्यासोबत लग्न केले. अनेकदा करिश्मा कपूर हिने म्हटले आहे की, लग्नानंतर लगेचच काही दिवसांमध्ये संजय कपूर याने मला मारहाण करण्यास सुरूवात केली होती.
इतकेच नाहीतर करिश्मा कपूर म्हणाली होती की, लग्नानंतर आम्ही फिरायला जेंव्हा गेला होतो, त्यावेळी संजय कपूर त्याच्या मित्रांसोबत माझी बोली लावत होता. करिश्मा हिने संजय कपूर याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.