सारा खान या अभिनेत्रीने ४० किलो वजन घटवलं, अखेर सांगितले हे २ उपाय

| Updated on: Jan 11, 2023 | 6:52 PM

बाॅलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री सारा अली खान हिने तब्बल ४० किलो वजन कमी केले आहे. सारा अली खान कायमच तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते.

सारा खान या अभिनेत्रीने ४० किलो वजन घटवलं, अखेर सांगितले हे २ उपाय
Follow us on

मुंबई : वाढलेले वजन ही सध्याच्या काळातील मोठी समस्या आहे. खराब जीवनशैली आणि जंक फूडच्या अतिसेवनामुळे वजन वाढते. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये व्यायाम करण्यास वेळही मिळत नाही. मात्र, एकदा जर आपले वजन वाढले की, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. आपले शरीर रोगांचे माहेरघर होऊन बसते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. मात्र, हवे तेवढे वजन कमी करण्यात अनेकांना यश मिळत नाही. जास्त व्यायाम करणे देखील आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे.

बाॅलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री सारा अली खान हिने तब्बल ४० किलो वजन कमी केले आहे.
सारा अली खान कायमच तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. अत्यंत कमी वेळामध्ये साराने अनेक हीट चित्रपट बाॅलिवूडला दिले असून साराचा आज चाहता वर्ग देखील मोठा आहे.

साराला तिच्या आईप्रमाणेच अभिनेत्री व्हायचे होते. परंतू ९६ वजन असलेल्या अभिनेत्रीला पाहण्यास चाहते इच्छुक नसल्याचे तिच्या लक्षात आले. इतकेच नाहीतर विमानतळावर साराची आई साराला घ्यायला आली होती. परंतू साराचे वाढलेले वजन पाहून ती साराला ओळखू शकली नव्हती.

सारा हिने अखेर ठरवून टाकले की, पुढच्या काळात आपल्याला वजन कमी करायचे आहे. सारा पिझ्झा, चाॅकलेट हे खूप जास्त खात होती. पिझ्झाशिवाय साराला राहणे देखील अवघड होते.

साराने वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये सर्वात अगोदर पिझ्झा खाणे बंद केले. पिझ्झाऐवजी तिने आहारामध्ये सलाडचा समावेश केला. साराने सुरूवातीला खूप व्यायाम करूनही तिचे वजन कमी होत नव्हते.

त्यानंतर साराने ट्रेनरला काॅल करत हे सर्व सांगितले असता. आठवड्यातील फक्त सहाच दिवस व्यायाम करण्याचा सल्ला ट्रेनरने दिला. यानंतर साराचे वजन कमी होण्यास सुरूवात झाली.

दीड वर्षांमध्ये साराने तब्बल ४० किलो वजन कमी केले. यामध्ये तिने डाएट आणि व्यायामावर विशेष लक्ष दिले. जोपर्यंत वजन कमी होणार नाही तोपर्यंत आईला व्हिडीओ काॅल करायचा नसल्याचे तिने ठरवले होते.

साराने वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये सर्वात अगोदर जंक फूड खाणे पूर्णपणे बंद केले. आठवड्यातून फक्त एकदा सारा आवडतीचे खाद्य घेते. खूप जास्त व्यायाम करणेही शरीरासाठी घातक असल्याचे साराने मुलाखतीमध्ये सांगितले.