मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही कायमच चर्चेत असते. विशेष म्हणजे विद्या बालन (Vidya Balan) ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी विद्या बालन कायमच काही व्हिडीओ आणि फोटो (Photo) शेअर करते. नुकताच विद्या बालन हिने एक मुलाखत दिलीये, ज्यामुळे सध्या ती चर्चेत आहे. या मुलाखतीमध्ये विद्या बालन हिने काही मोठे खुलासे केले आहेत. विद्या बालन हिने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ (Video) तयार केला होता. या व्हिडीओमध्ये ती अनुपमा मालिकेतील एक फेमस डायलॉग बोलताना दिसली. विशेष म्हणजे विद्या बालन हिचा हा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडला.
नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये विद्या बालन हिने काही मोठे खुलासे केले आहेत. विद्या बालन हिने सांगितले की, कशाप्रकारे बाॅलिवूडमधील सुरूवातीच्या दिवसांमध्ये तिच्यावर कशाप्रकारचा दबाव होता. विद्या बालन म्हणाली, करिअरच्या सुरूवातीच्या काळात नेहमीच चांगले दिसण्यासाठी एक दबाव माझ्यावर होता.
पुढे विद्या बालन म्हणाली, सुरुवातीला काय घालायचे आणि कसे राहायचे याबद्दल खूप जास्त दबाव असायचा. जेव्हा मी शूटिंग करत नव्हते किंवा कोणताही कार्यक्रम नसायचा तेव्हा मेकअपची गरज नसते. त्यामुळे मी मेकअप केल्याशिवायही घराबाहेर पडत असत. मात्र, कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणी फोटोग्राफर नसावा, यासाठी मी कायमच प्रार्थना करत असत.
बऱ्याच वेळा मी लगेचच पळत जात गाडीत बसायचे. कारण फक्त एकच असायचे की, आपल्याला बिना मेकअपचे कोणीही पाहू नये. त्यावेळी या सर्व गोष्टी खूप जास्त त्रासदायक असतात, पण आता अजिबात असे नाहीये…मला वाटते की, काही गोष्टी या वयाने आणि अनुभवामुळे पुढे बदलत जातात. बाकी आपल्या प्रत्येकाची इच्छा आहे. पुढेही तुम्हाला तसेच राहायचे आहे की, त्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत.
विशेष म्हणजे यावेळी विद्या बालन हिने अभिनेत्रींना कमी फी मिळणाऱ्या विषयावरही मोठे भाष्य केले. काही दिवसांपूर्वी विद्या बालन हिने अभिनेत्रींना अभिनेत्यापेक्षा कमी फी मिळत असलेल्या मुद्दावर आपले मंत मांडले होते. विद्या बालन कायमच तिच्या विधानामुळे चर्चेत असते. विद्या बालन सोशल मीडियावर बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसते. काही दिवसांपूर्वी तिने हातामध्ये न्यूज पेपर घेत एक खास बोल्ड फोटोशूट केले होते. ज्यानंतर अनेकांनी विद्या बालन हिच्यावर टिका देखील केली होती.