मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री यामी गौतम ही तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे कायमच यामी गौतम (Yami Gautam) ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. आपल्या प्रत्येक प्रोजेक्टबद्दल ती कायमच सोशल मीडियावर (Social media) पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना त्याबद्दलची माहिती शेअर करते. काही युजर्सच्या निशाण्यावर यामी गौतम आली होती. सोशल मीडियावर सतत यामी गौतम हिला ट्रोल केले जात होते. आता यामी गौतम हिने ट्रोल (Troll) करणाऱ्या लोकांना सडेतोड उत्तर देत त्यांची बोलती बंद केलीये. तिने एका नेटकऱ्याच्या कमेंटला उत्तर दिले आहे. काहींनी यानंतर आता यामी गौतम हिचे काैतुकही करण्यास सुरूवात केलीये.
आगामी चित्रपट चोर निकल के भागा यामुळे यामी गौतम ही चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. विशेष म्हणजे याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद देखील मिळाला. मात्र, दुसरीकडे काही युजर्स हे यामीला ट्रोल करताना दिसले आहेत. यामी गौतम हिने या युजर्सचा चांगलाच क्लास लावला आहे.
एका युजर्सने यादरम्यान यामी गौतम हिला तिच्या करिअरबद्दल सल्ला दिला. मात्र, यामी गौतम हिला तो सल्ला अजिबातच पटल्याचे दिसत नसून तिने चांगलेच या युजर्सला सुनावले आहे. यामी गौतम हिचे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ट्रोल करणाऱ्यांची चांगलीच बोलती बंद यामी गाैतम हिने केलीये.
I see the power of PR heavy activities/reviews/trend/perceptions/image etc which actors are relying on, and I judge no one. But I am a strong believer in ‘YOUR WORK IS YOUR BEST PR’. It’s a longer route but takes you the correct way ??? https://t.co/1c2ULqB2tj
— Yami Gautam Dhar (@yamigautam) March 4, 2023
एका युजर्सने लिहिले की, यामी गौतमला चांगली पीआर एजन्सी हायर करण्याची गरज आहे. त्यामुळे तिच्या करिअरमध्ये मोठे बदल होती आणि काहीतरी चमत्कार घडेल…यावर त्या युजर्सला फटकारत यामी गाैतम हिने लिहिले की, मुळात म्हणजे करिअरसाठी पीआर एजन्सी नव्हेतर चांगले काम करणे आवश्यक आहे.
आता यामी गौतम हिची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे यामी गौतम हिचे म्हणणे अनेकांना पटले आहे. आता यावर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत यामी गौतम हिचा सपोर्ट करत आहेत. काही दिवसांपूर्वी यामी गाैतम ही लॉस्ट चित्रपटामध्ये दिसली होती. उरी चित्रपटानंतर यामी गौतम हिच्या फॅन फाॅलोइंगमध्ये मोठी वाढ झालीये. आता चाहते तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.