मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमच्या (Yami Gautam) ‘ए थर्स डे‘ (A Thursday) या चित्रपटाचा टीझर आऊट झालाय. हा चित्रपट लवकरच डिझ्नी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar) या ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर यामीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा टीझर आवडल्याचं अनेकांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत म्हटलं आहे. तर काहींनी कमेंट करत हा चित्रपट कधी येणार, याचा ट्रेलर कधी येणार, असं यामीली विचारलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या (गुरुवार) रिलीज होणार आहे.
‘ए थर्स डे’चा टीझर
‘ए थर्स डे’ या चित्रपटाचा टीझर आऊट झाला आहे. याच एका खोलीत जेवण, केक असं बरंच काही दिसतंय. ही खोली अस्ताव्यस्थ दिसतेय. टीझरमध्ये लहान मुलांचा आवाज येतोय. त्यांची खेळणी दिसत आहेत. या टीझरच्या शेवटची यामी गौतम येते आणि तिच्यावर कॅमेरा जातो. यात यामीचं पात्र हे भयावह दाखवण्यात आलं आहे. तिची ही वेगळी भूमिका तिच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरताना दिसतेय.
यामीची इन्स्टाग्राम पोस्ट
यामी गौतमच्या ‘ए थर्स डे’ या चित्रपटाचा टीझर आऊट झालाय. हा टिझर तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याला तिने तितकंच समर्पक कॅपशन दिलं आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय, “सभ्यतेचा चेहरा या दिवशी बदलला.”
हा सस्पेन्स ड्रामा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिझ्नी प्लस हॉटस्टारवर हा सिनेमा पाहता येईल. या सिनेमाचा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या