Brahmastra OTT Release | रणवीर- आलियाचा ब्रह्मास्त्र चित्रपट ‘या’ दिवशी बघा ओटीटीवर

| Updated on: Oct 23, 2022 | 2:13 PM

बाॅक्स आॅफिसवर धमाका केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर आपली जादू करण्यास सज्ज झालाय.

Brahmastra OTT Release | रणवीर- आलियाचा ब्रह्मास्त्र चित्रपट या दिवशी बघा ओटीटीवर
Follow us on

मुंबई : कोरोनानंतर बाॅक्स आॅफिसवर ब्रह्मास्त्र चित्रपट हीट ठरला. या चित्रपटात (Movie) रणवीर कपूर आणि आलिया भट्टसह बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार आहेत. सुरूवातीपासूनच चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल एक खास क्रेझ होती. ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर सुरू असतानाच बाॅक्स आॅफिस कलेक्शन चित्रपटाचे जबरदस्त राहिले. या चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीने (Ayan Mukerji) चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही कुठलीच कसर सोडली नव्हती.

बाॅक्स आॅफिसवर धमाका केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर आपली जादू करण्यास सज्ज झालाय. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा होत्या की, रणवीर आणि आलियाचा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. मात्र, नेमक्या कोणत्या तारखेला चित्रपट रिलीज होणार हे कळू शकले नव्हते. परंतू चित्रपट निर्मात्यांकडून याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आलीये.

ब्रह्मास्त्र हा चित्रपट डिज्नी +हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. हा यावर्षीचा सर्वात मोठ्या बजेटचा चित्रपट आहे. सुरूवातीला चित्रपटाचा जोरदार विरोधात करण्यात आला. मात्र, त्यानंतर चित्रपट हीट ठरला. हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत हा चित्रपट आता तुम्ही ओटीटीवर पाहू शकणार आहात.

ब्रह्मास्त्र चित्रपट आपल्या मोबाईलवर आणि घर बसल्या बघण्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे. कारण हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी डिज्नी +हॉटस्टारवर बघता येणार आहे. कोरोनाच्या काळानंतर प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणे टाळत आहेत. यामुळे ओटीटीवर चित्रपट रिलीज करण्यावर निर्मात्यांचा कल आहे.