मुंबई : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा (Sonakshi Sinha) डबल एक्सएल हा जबरदस्त चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सोनाक्षी आणि हुमा कुरेशीचा हा चित्रपट हीट ठरणार हे नक्कीच आहे. कारण या चित्रपटात ज्वलंत विषयावर हात घातलाय. ज्या मुलींचे वजन (Weight) जास्त असते, अशांना किती समस्यांना सामोरे जावे लागते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. इतकेच नाही तर वजन जास्त असलेल्या मुलींना अनेक ठिकाणी नोकरी देणे देखील टाळले जाते. नुकताच डबल एक्सएल चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) रिलीज झालाय.
डबल एक्सएल चित्रपटात दाखवण्यात आले आहे की, वजन जास्त असलेल्या मुलींना बॉडी शेमिंगच्या त्रासालाही सामोरे जावे लागते. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. आता जबरदस्त असा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. या चित्रपटासाठी हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हाने तब्बल 20 किलो वजन वाढवले होते.
गेल्या काही दिवसांपासून चाहते सातत्याने सोनाक्षीच्या या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहात होते. ट्रेलर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय. चाहत्यांना हुमा आणि सोनाक्षीचा अभिनय प्रचंड आवडलाय. लठ्ठ मुलींना बॉडी शेमिंग करणाऱ्यांना या चित्रपटातून सडेतोड उत्तर देण्यात येणार आहे. हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सतराम रमाणी यांनी केलंय.