ऋचा चड्ढा आणि अली फजलचं या दिवशी लग्न, लग्नसमारंभ चालणार तब्बल 2 नाही तर…

| Updated on: Sep 07, 2022 | 7:36 AM

बाॅलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाच्या चर्चा 2020 पासून सुरू आहेत. मात्र, कोरोनाच्या काळात निर्बंधांमुळे त्यांना लग्न करणे शक्य झाले नाही. मात्र, शेवटी 2022 मध्ये त्यांच्या लग्नाचा मुहूर्त घडून आलायं.

ऋचा चड्ढा आणि अली फजलचं या दिवशी लग्न, लग्नसमारंभ चालणार तब्बल 2 नाही तर...
Follow us on

मुंबई : बॉलिवूडमधील (Bollywood) फेमस जोडी ऋचा चड्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून येत आहेत. मात्र, कोरोना आणि शूटिंगमुळे त्यांचे लग्न पुढे ढकलत होते. ऋचा आणि अलीचे चाहते देखील गेल्या कित्येक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात आहेत. आता ऋचा चड्ढा (Richa Chadha) आणि अली फजलच्या चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. विशेष म्हणजे याच महिन्याच्या शेवटी हे दोघे लग्न करणार असून दिल्लीसह मुंबईमध्ये (Mumbai) लग्नाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मिळतयं.
4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 07 September 2022 -TV9

जवळच्या मित्र आणि कुटुंबासह विवाह सोहळा पार पडणार

बाॅलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाच्या चर्चा 2020 पासून सुरू आहेत. मात्र, कोरोनाच्या काळात निर्बंधांमुळे त्यांना लग्न करणे शक्य झाले नाही. मात्र, शेवटी 2022 मध्ये त्यांच्या लग्नाचा मुहूर्त घडून आलायं. ऋचा आणि अली याच महिन्यामध्ये लग्न बंधणात अडकणार आहेत. दिल्ली आणि मुंबई येथे जवळच्या मित्र आणि कुटुंबासह विवाह सोहळ आणि रिसेप्शन पार पडणार असल्याची महत्वाची आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबईत लग्न समारंभ तब्बल 5 दिवस चालणार…

ऋचा चड्ढा आणि अली फजल हे एप्रिल 2020 मध्ये लग्न करणार होते. मात्र, कोरोना आणि शूटिंग शेड्युलमुळे लग्न पुढे ढकलले गेले. मुंबईतील एका पॉश हॉटेलमध्ये दोघांचे लग्न होणार आहे. विशेष म्हणजे हे लग्न तब्बल 5 दिवस चालणार आहे. मात्र, लग्न हिंदू- मुस्लिम यांपैकी नेमक्या कोणत्या रितीरिवाजाने केले जाणार याबद्दल अजून काही अधिक माहिती मिळू शकली नाहीयं. रिचा चढ्ढा ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ आणि ‘फुक्रे 3’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.