सध्या सर्वत्र नवरात्र उत्सव साजरा केला गेला. अनेक ठिकाणी दांडिया अन् गरबा रास रंगला. मुंबईत अनेक ठिकाणी दुर्गा पूजाचे कार्यक्रम झाले. या कार्यक्रमांना बॉलीवूडमधील स्टार आले होते. बॉलीवूड अभिनेत्री काजोल दुर्गा पूजेच्या कार्यक्रमांना गेली. परिवारातील सदस्यासह काजोल सांताक्रूजमधील नॉर्थ बॉम्बे सर्बोजनिन दुर्गा पूजामध्ये आली होती. त्या ठिकाणचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काजोल चांगलीच भडकलेली दिसत आहे. काजोलच्या संताप करण्याचे कारण काय होते…
सांताक्रूझमधील नॉर्थ बॉम्बे सर्वोजनीन दुर्गापूजेचे काजोलचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बॉलीवूड अभिनेत्री काजोलने दुर्गा पूजा पंडालमध्ये चपला, शूज घालून प्रवेश करणाऱ्यांवर काजोल संतापली आहे. तिने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. इंस्टाग्रामवर तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. शूज घालून देवीच्या जवळ येणाऱ्या लोकांचा तिने विरोध केला आहे. पवित्र ठिकाणी शिष्टाचार पाळण्याचे ती सांगत आहे.
व्हिडिओमध्ये कोणातरीकडे इशारा करत अभिनेत्री काजोल संतापलेली दिसत आहे. ती म्हणते, बाजूला व्हा. तुम्ही शूज घातले आहे. कृपया या ठिकाणी शूज घालू नका. ज्यांनी शूज घातले आहे, त्यांनी दुसऱ्या बाजूला जावे. ही एक पूजा आहे. आपण सर्वांनी तिचा सन्मान ठेवला पाहिजे. मागे उभ्या असलेल्या लोकांशी बोलताना काजोल म्हणते, कृपया बॅरिकेडवरुन येऊ नका. त्यामुळे तुम्हाला दुखापत होऊ शकते. जेव्हा काजोल लोकांना अपील करत होती, तेव्हा तिची बहीण तनीषा मुखर्जी आणि अभिनेत्री आलिया भट्ट तिच्याजवळ होती.
सोशल मीडियावर काजोलच्या या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले आहे. हजारो जणांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी काजोलचे कौतूक केले आहे. धार्मिक ठिकाणी पावित्र्य जपले पाहिजे, असे सर्वच युजरने म्हटले आहे. एका युजरने तर काजोलचा उल्लेख लेडी सिंघम केला आहे.