मुंबई : गुरुवारी सकाळपासून अचानक #BoycottShahRukhKhan असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे. शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांचा एक फोटो ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि संपूर्ण प्रकरणाची सुरुवात येथून झाली आहे.
सोशल मीडियावर, वापरकर्ते इमरान खानसोबत शाहरुखचा एक जुना फोटो शेअर करून राग व्यक्त करत आहेत. सगळे चाहते अभिनेत्यावर बहिष्कार घालण्याची मागणी करत आहेत. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी नुकतीच सत्ता काबीज केल्यापासून इमरान खानवर तालिबानला मदत केल्याचा आरोप होत आहे. तालिबान सरकारमध्ये कोण असेल आणि कोण नाही, याचा निर्णय पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या संचालकांच्या उपस्थितीत घेण्यात आला होता.
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत तालिबानला मदत करण्याचे आवाहन केले होते. इमरान खान म्हणाले की, जर संपूर्ण जगाने तालिबानला मदत केली, तर ही संघटना योग्य दिशेने वाटचाल करू शकते. असे मानले जाते की, पाकिस्तानची ही भूमिका भारताविरोधी स्थिती आणखी मजबूत करू शकते.
पाकिस्तानचा पंतप्रधान इमरान खान आणि अभिनेता शाहरुख खान यांचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. याच फोटोने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. शाहरुखला इमरानसोबत पाहून, वापरकर्ते संतापले आहेत आणि शाहरुख खानवर व त्याच्या आगामी चित्रपटावर पूर्णपणे बहिष्कार घालण्याची मागणी करत आहेत.
Retweet ?#BoycottShahRukhKhan pic.twitter.com/DNUryuv1Rj
— Sonu Nagar ?? (@sonugurjarr) September 16, 2021
सोशल मीडियावर सध्या एका जाहिरातीची चर्चा आहे. या जाहिरातीच्या व्हिडीओच्या शेवटी, त्याचा सहकारी असे म्हणतो की, शाहरुख खान वगळता सर्वात मोठे स्टार्स डिस्ने प्लस हॉटस्टारवर आहेत. करण जोहरनं ही पोस्ट शेअर करत शाहरुखनं लिहिलं आहे की- हम्म्म पिच्चर अजून बाकी आहे… माझ्या मित्रा.
शाहरुख खानचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चाहत्यांना वाटतंय की SRK OTT प्लॅटफॉर्मवर धमाका करणार आहे. या व्हिडीओसह शाहरुखनं चाहत्यांना एक इशारा दिला आहे.
शाहरुख खान शेवटी झिरो चित्रपटात कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मासोबत दिसला होता. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून शाहरुखनं अभिनय जगापासून अंतर ठेवलं आहे. तो लवकरच दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसोबत पठाण चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.
‘झिरो’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित परिणाम साध्य करण्यात अपयशी ठरल्यानंतर शाहरुख खानने त्याच्या चित्रपटांबाबत बरीच खबरदारी घेणे सुरू केले आहे. ‘झिरो’ च्या आधी रिलीज झालेले शाहरुखचे चित्रपट ‘रईस’, ‘जब हॅरी मेट सेजल’, ‘डिअर जिंदगी’, ‘दिलवाले’, ‘हॅपी न्यू इयर’ आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’ होते. शाहरुख आता मोठ्या पडद्यावर सामान्य लोकांची भूमिका करण्यापासून दूर आहे. त्याच्या जवळच्या मित्रांचा असा विश्वास आहे की, शाहरुखला आता फक्त अशा दिग्दर्शकांसोबत काम करायचे आहे ज्यांच्याकडे त्याला नवीन शैलीत चित्रपट सादर करण्याची क्षमता आहे. या प्रकरणामध्ये दिग्दर्शक फरहान अख्तरचा ‘डॉन 3’ हा चित्रपटही अद्याप सुरू झालेला नाही.
Sonu Sood | आयकर विभाग अधिकारी पुन्हा सोनू सूदच्या घरी, आधीही 20 तास झाडाझडती
मिस्टर इंडिया मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न, साहिल खानचा जॅकी श्रॉफच्या बायकोशी काय वाद होता?