मुंबई : कोरोनामुळे (Corona) महाराष्ट्रातील सिंगल स्क्रीन सिनेमा आणि चित्रपटगृहे (Theatrrs) आतापर्यंत बंद ठेवण्यात आली होती. अशा परिस्थितीत, आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सचिवालयानं एक निवेदन जारी केले आहे, आता एक नवीन माहिती शेअर करत म्हटलं आहे की, 22 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात सिनेमा आणि चित्रपटगृहे सुरू होतील. आता थिएटर मालकांना कोरोनाच्या नियमांचं पालन करावं लागेल. त्याची मार्गदर्शक तत्वे लवकरच जारी केली जातील. ही बातमी आल्यापासून सिनेमा रसिकांचा उत्साह सोशल मीडियावर पाहायला मिळतो आहे. त्यात आता अनेक बॉलिवूड स्टार्स देखील ही बातमी आल्यानंतर खूप आनंदी दिसत आहेत.
आलिया भट्टने सोशल मीडियावर ही बातमी शेअर करून आपला आनंद व्यक्त केला आहे. त्याचबरोबर बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक झोया अख्तर देखील ही बातमी आल्यानंतर खूप आनंदी आहे. एका पोस्टवर कमेंट करत तिने आनंद व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी वरुण धवननं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक छोटासा व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये, तो आपल्या कारमध्ये बसून बाजारात जाताना दिसत होता, दरम्यान त्या बाजारात खूप गर्दी दिसत होती. हा व्हिडीओ शेअर करुन वरुण म्हणाला होता की, जेव्हा आपल्या देशातील बाजारपेठा उघडता येतात, तत सिनेमागृह उघडण्यात काय अडचण आहे.
आज ही नवी बातमी आल्यानंतर असं दिसतंय की सरकारने वरुण धवनचा दृष्टिकोन स्वीकारला आहे. गेल्या 1 वर्षापासून बंद असलेल्या सिनेमा हॉलचं खूप नुकसान झालं आहे. अनेक बॉलिवूड कलाकार आहेत ज्यांना त्यांचे चित्रपट फक्त सिनेमागृहांमध्ये रिलीज करायचे आहेत. या यादीतील पहिलं नाव अक्षय कुमारचं आहे. अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट गेल्या मार्चमध्ये प्रदर्शित होणार होता, पण कोरोनामुळे सिनेमा बंद झाला आणि या चित्रपटाची रिलीज थांबवण्यात आली. ही बातमी आल्यानंतर सिनेमाशी संबंधित ट्रेड अॅनालिस्ट सांगतात की ‘सूर्यवंशी’ आता दिवाळीला रिलीज होईल, ज्याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. त्याचबरोबर सलमान खानचा ‘अंतिम’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.
पाहा पोस्ट
फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये एक खास फोटो शेअर केला आहे, ज्यात असं लिहिलं आहे की रोहित शेट्टी आणि जयंतीलाल गडा सारख्या चित्रपट निर्मात्यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेतली, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आता रोहित शेट्टीनेही एक खास पोस्ट केली आहे.
अक्षय कुमारने सिनेमा हॉल उघडल्याच्या आनंदात एक खास पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्याने आनंद व्यक्त केला आहे की आता त्याचा ‘सूर्यवंशी’ चित्रपट आरामात रिलीज होईल.
संबंधित बातम्या
Bigg Boss Marathi 3 | ‘महिला, महिला आणि भांडायला पहिला…’, सोनालीची तृप्ती देसाईंसोबत तूतू-मैमै!
Parineeti Chopra : व्हेकेशन मोड ऑन, परिणीती चोप्रा कुटुंबासोबत करतेय मालदीवची सफर