कॉमेडी किंग कपिल शर्मा (Kapil Sharma) नेहमीच कुठल्या ना कुठल्या वादामुळे चर्चेत येतो. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्याला आणि त्याच्या शोला ट्रोल केलं जातंय. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाला ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आमंत्रित न केल्याची तक्रार केली जात आहे. ‘झुंड’मध्ये ग्लॅमर नाही म्हणून कपिलने त्या टीमला बोलावलं नाही, असा आरोप नेटकरी करत आहेत. यावरून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर आता चित्रपटाची निर्माती सविता राज हीरेमथ यांनी त्यांची बाजू मांडली आहे. “आमच्या चित्रपटाचं प्रमोशनच उशिरा सुरू झालं होतं”, असं म्हणत त्यांनी कपिलचा बचाव केला आहे.
‘झुंड’चं प्रमोशन उशिरा सुरू झालं
‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत सविता म्हणाल्या, “आमच्या चित्रपटाचं प्रमोशन फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालं. त्यावेळी कपिल शर्मा हा आठवडाभरासाठी सुट्टीवर गेला होता. जेव्हा तो भारतात परत आला तेव्हा आम्ही शोमध्ये जाण्याबाबत निर्णय घेऊ शकलो नाही. कपिल फक्त मोठ्या बजेटच्या चित्रपटांनाच आमंत्रित करतो, असं काही नाही.”
Shameful#BoycottKapilSharmaShow#boycottkapilsharma pic.twitter.com/stL08Dh1C2
— Aman Nath Tiwari (@AnuragT78125265) March 8, 2022
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या ट्विटमुळे वाद
याआधी ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर #BycottKapilSharmaShow चा ट्रेंड सुरू झाला. या हॅशटॅगचा वापर करत नेटकऱ्यांनी कॉमेडियन कपिल शर्माविरोधात संताप व्यक्त केला आणि त्याच्या शोवर बंदी घालण्याची मागणी केली. ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये मोठमोठे स्टार्स नसल्याने कपिल शर्माने आम्हाला त्यांच्या शोमध्ये बोलावलं नाही, अशा आशयाचं हे ट्विट होतं. त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. विवेक अग्निहोत्रींच्या या ट्विटनंतर काही दिवस कपिलने या विषयावर मौन बाळगलं. मात्र आता त्याने एका नेटकऱ्याच्या ट्विटवर उत्तर देत अखेर मौन सोडलं आहे. ‘ज्या लोकांनी हेच सत्य आहे असं मानलंय, त्यांना स्पष्टीकरण देण्यात काय उपयोग’, असा टोला कपिलने ट्रोलर्सना लगावला आहे.
हेही वाचा:
‘द काश्मीर फाईल्स’च्या पल्लवी जोशी, विवेक अग्निहोत्रींविरोधात काढण्यात आला फतवा
‘मुळशी पॅटर्न’मध्ये चहाची टपरी चालवणारी अभिनेत्री आता चालवतेय कोट्यवधींची कंपनी