मुंबई : अभिनेत्री ऋचा चड्ढा हिने लष्करावर केलेल्या एका कमेंटमुळे वादात सापडली आहे. अनेकांनी ऋचावर टीका केलीये. अनुपम खेर यांच्यापासून ते अक्षय कुमारपर्यंत सर्वांनीच ऋचा हिचा समाचार घेतलाय. सोशल मीडियावर देखील ऋचा हिच्याविरोधात संतापाची लाट निर्माण झालीये. अनेकांनी तर ऋचाला ट्रोल करण्यास सुरूवात केलीये. ऋचा चड्ढा हिने यावर माफी मागत स्पष्टीकरण दिले आहे. परंतू ऋचा चड्ढा हिच्याविरोधात अजूनही संताप व्यक्त केला जातोय.
बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने ऋचा चड्ढाने केलेल्या त्या कमेंटचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि ऋचा हिचा चांगलाच समाचार घेतला. कारण देशाच्या लष्कराविरोधात कोणी बोलत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे.
आर्मी कमांडर लेफ्टनंट उपेंद्र द्विवेदी यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देणे ऋचा चड्ढाला महागात पडले असून प्रत्येकजण तिच्यावर टीका करत आहे. अनुपम खेर यांनीही ऋचा चड्ढावर टीका केलीये.
“आप आम खाते हैं?
कैसे खाते हैं? काट कर खाते हैं या गुठली के साथ – वो wash basin पर खड़े हो कर आम खाने का मज़ा ही कुछ और है”
आप ऐसे सवालों तक ही सीमित रहिए
एक विदेशी से भला हम अपनी सेना के शौर्य और पराक्रम और राष्ट्रवाद पर भाषण क्यों सुनें? https://t.co/cJXML6V8Z6
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) November 24, 2022
अक्षय कुमारने ऋचा चड्ढाच्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले होते की, आपण आपल्या सशस्त्र दलांप्रती कधीही कृतघ्न होऊ नये. ते आहेत तर आपण आज आहोत, असे अक्षयने पोस्टमध्ये म्हटले आहे.
अक्षय कुमारच्या या पोस्टवर रीट्वीट करत काँग्रेसच्या प्रवक्ता सुप्रिया यांनी म्हटले आहे की, तुम्ही आंबा खाता का? तुम्ही कसे खाता? तो कापून खाता… वॉश बेसिनवर उभे राहून आंबे खाण्याची मजा काही वेगळीच असते. आपल्या सैन्याचे शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रवादावर परकीयांकडून भाषण का ऐकावे?’
सुप्रिया यांनी अक्षय कुमारला टार्गेट करत हे रीट्वीट केले आहे. अक्षय कुमारने या गोष्टींवर बोलू नये असे सुप्रिया यांना वाटत आहे. आता हा वाद वाढण्याची दाट शक्यता आहे, अक्षय कुमार यावर काय प्रतिक्रिया देतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.