Aishwarya Rai: बच्चन परिवारात वाद असल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे. दिवाळीत ऐश्वर्या राय परिवारासोबत दिसली नाही. ऐश्वर्याने परिवारापासून अंतर ठेवले आहे. बच्चन परिवारातील एक, एक सदस्याचे समाजात मोठे नाव आहे. त्यानंतर या सर्व प्रकरणात लोकांनी ऐश्वर्याला सपोर्ट केले आहे. लोक ऐश्वर्याला सपोर्ट करण्याचे कारण काय आहे? ऐश्वर्यापासून कोणत्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत?
ऐश्वर्या राय आणि बच्चन परिवारातील सदस्य अमिताभ बच्चन, जया बच्चन, नणंद श्वेता बच्चन नंदा यांच्याबाबत अनेक अफवा सुरु आहेत. परंतु त्या सर्वांवर ऐश्वर्याकडून काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली गेली नाही. तिने या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही. उलटपक्षी तिने मौन राखून स्पष्टपणे दाखवून दिले की गॉसिप्सला ती महत्व देत नाही. नेहमी या परिस्थितीत असे दिसले आहे की, दुसरा पक्ष परिस्थितीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात. परंतु ऐश्वर्याने असा काहीच प्रयत्न केला नाही. यामुळे लोकांच्या मनात ऐश्वर्यासंदर्भात सन्मान वाढला आहे.
बच्चन कुटुंबाने संकेत दिले की, सून ऐश्वर्याला त्यांच्या कुटुंबात आता स्थान नाही. मग केबीसीमधील अमिताभ यांच्या वाढदिवसाच्या स्पेशल व्हिडिओमध्ये ऐश्वर्या नव्हती. सोशल मीडियावरील पोस्टवर तिच्यासाठी काहीही लिहिले नव्हते. दुसरीकडे ऐश्वर्याने तिचे कर्तव्य केले आहे. सासरे अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाही ती दिसली. त्यातून परिस्थिती कशीही असली तरी ती कोणाचाही आदर करणे ती कधीच सोडणार नाही, हा संदेश तिने दिला.
ऐश्वर्याला कधीही लाजिरवाण्या अवस्थेत डोळे खाली करुन माध्यमांसमोर दिसली नाही. उलट ती ताठ मानेनेच सर्वत्र वावरत राहिली. विपरीत परिस्थितीत या पद्धतीने वागणे लोकांना खूप आवडले. या संपूर्ण प्रकरणामध्ये आराध्या तिची आई ऐश्वर्या राय हिच्यासोबत खंबीरपणे उभी आहे. सहसा अशा परिस्थितीत पालक मुलावर चिडतात आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. मुलांना दोन्ही पालकांकडून प्रेम मिळणे अशक्य होते. परंतु ऐश्वर्याने असे काहीच केले नाही. आराध्याला अनेक प्रसंगी तिच्या वडिलांसोबतचे क्षण शेअर करताना आणि एन्जॉय करताना दिसली आहे. यामुळेच लोक ऐशचे कौतुक करत आहेत.