Nora Fatehi ED | सुकेश शेखर 200 कोटी फसवणूक प्रकरण, नोरा फतेही ईडी कार्यलयात दाखल, चौकशी सुरु

| Updated on: Oct 14, 2021 | 2:48 PM

सुकेश चंद्र शेखरच्या 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेहीला (Nora Fatehi) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जारी केले आहे. या समन्सनंतर नोरा फतेही दिल्लीस्थित ईडी कार्यालयात दाखल झाली असून तिची चौकशी करण्यात येत आहे.

Nora Fatehi ED | सुकेश शेखर 200 कोटी फसवणूक प्रकरण, नोरा फतेही ईडी कार्यलयात दाखल, चौकशी सुरु
NORA FATEHI
Follow us on

नवी दिल्ली : दिल्लीच्या तिहार कारागृहात बंद असलेल्या सुकेश चंद्र शेखरच्या 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेहीला (Nora Fatehi) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स जारी केले आहे. या समन्सनंतर नोरा फतेही दिल्लीस्थित ईडी कार्यालयात दाखल झाली असून तिची चौकशी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसलादेखील समन्स जारी करण्यात आलं आहे.

नोरा फेतही तसेच जॅकलीन फर्नांडिसचीही फसवणूक

सुकेशवर नोरा फतेहीचीच नव्हे, तर अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचीही फसवणूक केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणाशी निगडित चौकशी करण्यासाठी नोराला दिल्ली ईडने बोलावले आहे. सध्या नोरा ईडीच्या दिल्ली येथील कार्यालयात पोहोचली आहे. या प्रकरणी तिच्याकडून काही माहिती विचारण्यात येत आहे.

नेमकं प्रकरण काय आहे ?

सुकेशचंद्र शेखर आणि त्याची कथित पत्नी अभिनेत्री लीना पॉल 200 कोटी रुपये उकळल्याप्रकरणी तुरुंगात आहेत. इतर लोकांप्रमाणेच सुकेशने नोरा फतेहीला त्याच्या जाळ्यात अडकवण्याचा कट रचला होता. नोरा आणि जॅकलिन व्यतिरिक्त सुकेशच्या निशाण्यावर अनेक बॉलिवूड कलाकार आणि चित्रपट निर्माते होते. याच प्रकरणात नोराची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.

कोण आहे नोरा फतेही ?

नोरा फतेही बॉलिवुडची प्रसिद्ध आणि आघाडीची अभिनेत्री आहे. आपली अदाकारी तसेच नृत्याच्या जोरावर तिने बॉलिवुडमध्ये मानाचं स्थान मिळवलेलं आहे. अनेक डान्स रियालिटी शोमध्ये ती प्रमुख पाहुणी तसेच परिक्षक म्हणून उपस्थित असते. तिच्या डान्सचे लाखो लोक दिवाने आहेत. नोराने हिंदी, तेलुगू, मल्याळम, तसेच तमिळ भाषेतील चित्रपटांत नृत्य म्हणजे आयटम सॉंग केलेले आहेत. टेम्पर, बाहुबली किक-2 अशा चित्रपटातदेखील तिने आपला नृत्याविष्कार दाखवलेला आहे. दिलबर दिलबर या गाण्यातील नृत्यामुळे तिला भारतभर विशेष प्रसिद्धी मिळाली.

इतर बातम्या :

लोकप्रिय नायिकांच्या मांदियाळीत रंगणार सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या नवरात्री विशेष भाग!

Nora Fatehi | शॉर्ट्स परिधान करून इंग्रजी गाण्यावर थिरकली नोरा फतेही, पाहा तिचा अतरंगी डान्स Video

Nusrat Jahan : यश दास गुप्तासोबत रोमँटिक झाली नुसरत जहाँ, केलं नवं फोटोशूट