मुंबई : कल्याणजी-आनंदजी (Kalyanji-Anandji Duo) ही जोडी एके काळी महान संगीतकार अशी जोडी होती. आज या जोडीतील महान संगीतकार कल्याणजी (Kalyanji Death Anniversary) यांची पुण्यतिथी आहे. आनंदजी जितके आनंदी आणि हसमुख होते, त्यांचे मोठे भाऊ कल्याणजी हे तितकंच गंभीर व्यक्तिमत्व होतं. दोघांनी मिळून हिंदी चित्रपटसृष्टीतील एका पेक्षा एक उत्तम गाणी आपल्या संगीतानं सजवली. या जोडीनं चित्रपटसृष्टीला 250 हून अधिक गाणी दिली. कल्याणजीबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा सुरुवातीपासूनच संगीताकडे कल होता. याचं एक कारण असंही होतं की, आजी -आजोबांची लोकसंगीतात चांगली पकड होती. त्यांच्या आजी-आजोबांप्रमाणेच कल्याणजी-आनंदजींच्या आयुष्यात संगीत आलं.
पहिल्यांदा क्लॅविओलिनचा वापर, पहिलं रॅप साँग आणि पहिल्यांदाच हिंदी चित्रपटात अझानचा समावेश
60 आणि 70 च्या दशकात या जोडीनं संगीताला पूर्णपणे बदललं. नवीन पर्व सुरू झाल्यावर या जोडीचं संगीतही बदललं. या संगीतकार जोडीनं संगीतप्रेमींना प्रत्येक जॉनरची गाणी दिली. ’60 च्या दशकापासून ते’ 70 च्या दशकापर्यंत कल्याणजी आणि आनंदजी यांच्या जोडीनं चित्रपटसृष्टीला अशा अनेक गोष्टी दिल्या ज्या यापूर्वी कोणीही आजमावल्या नव्हत्या. जसं त्यांनी नागिन बीनला संगीत देण्यासाठी पहिल्यांदा क्लॅविओलिनचा वापर केला. इंडस्ट्रीला पहिल्यांदा रॅप साँग दिलं. आम्ही बोलत आहोत ‘जब जब फूल खिले’ या चित्रपटातील ‘तुमको हमपे प्यार’ आया या गाण्याबद्दल. याशिवाय, या जोडीनं पहिल्यांदाच एका हिंदी चित्रपटात अझानचा समावेश केला. एवढंच नाही तर ही अशी पहिली जोडी आहे, ज्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण लेखक, गायक, दिग्दर्शकांसह काम केलं आहे म्हणजेच त्यांच्या पहिल्या चित्रपटात त्यांच्यासाठी काम केलं आहे.
उधारी फेडण्याऐवजी उस्तादांनी दिलं संगिताचं शिक्षण
कल्याणजी आणि आनंदजी गुजराती कुटुंबातील होते. कल्याणजी-आनंदजींच्या संगीताच्या सुरुवातीच्या शिक्षणाविषयी माध्यमांच्या अनेक बातम्यांमध्ये अनेक कथा आणि किस्से आहेत. यापैकी एक आहे कल्याणजी-आनंदजींना एका उस्तादांनी शिकवलेलं संगीत, अन्नू कपूरनं आपल्या एका शोमध्ये सांगितलं की इंटरनेटवर अनेक ठिकाणी एक कथा प्रकाशित झाली होती. ज्यात म्हटलं गेलं की कल्याणजी आणि आनंदजींचे वडील विरजी शाह किराणा दुकान चालवायचे आणि हे दोन्ही भाऊ त्या दुकानावर वडिलांची मदत करायचे. एक उस्तादजी त्यांच्या दुकानात सामान खरेदी करण्यासाठी येत असत, या उस्तादजींना संगीताची चांगलीच समज होती. ते उत्तम संगीतकार होते.
हे उस्तादजी अनेकदा वीरजी शाह यांच्या दुकानातून सामान उधार घेऊन घ्यायचे. असं करत त्यांच्यावर जास्त रुपयांची उधारी झाली. अशा परिस्थितीत, एक दिवस उस्तादजी दुकानात वस्तू घेण्यासाठी आले असता वीरजी शाहांनी त्यांना सांगितलं की, उस्तादजी आता तुम्ही उधार घेऊ शकणार नाहीत. खूप पैसे झाले आहेत, म्हणून आधी पैसे भरा आणि मग पुढे सामाम घ्या. यावर उस्तादजी म्हणाले की माझ्याकडे पैसे नाहीत, पण हो संगीत मात्र आहे. जर तुम्ही संगिताशी संबंधित काही घेऊ शकत असाल तर घ्या. विरजी शहांना वाटलं की हा उस्ताद खोटं बोलत आहे. त्यांनी उस्तादांची परिक्षा घेण्याचं ठरवलं आणि म्हणाले, ठीक आहे हे माझे दोन मुलं आहेत, त्यांना घेऊन जा आणि त्यांना संगीत शिकवा. अशा पद्धतीनं कल्याणजी आणिआनंदजींचं संगीत शिक्षण सुरू झालं.
मात्र, हे किस्से कितपत सत्य आहेत, हे खुद्द आनंदजींनी दिलेल्या मुलाखतीत उघड झालं. त्यांनी या उस्तादांची कथा पूर्णपणे खोटी असल्याचं सांगितलं होतं. अन्नू कपूर पुढे स्पष्टीकरण देताना म्हणाले की आनंदजींनी त्याबद्दल सांगितलं होतं – तुम्हाला काय वाटतं की संगीत हे तूर आणि दाळीसारखं आहे… जे तुम्ही पैशांनी खरेदी करू शकता. संगीत असं शिकता येत नाही. जर असं असतं तर जगातील प्रत्येक व्यक्ती एक कलाकार बनला असता. आपल्या इथं एक म्हण आहे – ‘मनुष्य होना भाग्य की बात है, लेकिन कलाकार होना सौभाग्य की बात है…’ आणि प्रत्येकाला हे सौभाग्य मिळत नाही.
संबंधित बातम्या
BMC election : काँग्रेसकडून थेट महापौरपदाची ऑफर, सोनू सूदची पहिली रोखठोक प्रतिक्रिया
Thalaivii : कंगना रनौतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ तारखेला रिलीज होणार ‘थलायवी’