मुंबई : काही दिवसांपूर्वी बातम्या आल्या होत्या की, अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंहमध्ये सर्वकाही अलबेल नाहीये. इतकेच नाही तर हे दोघे घटस्फोट घेणार असल्याचे देखील सांगण्यात येत होते. यानंतर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण देखील बघायला मिळाले. दवाखान्यात (Hospital) देखील दीपिका एकटीच पोहचल्याने तर या बातमीला हवाच मिळाली. यावर रणवीर किंवा दीपिकाने देखील बरेच दिवस काहीच भाष्य केले नव्हते. यामुळे खरोखरच दीपिका आणि रणवीर विभक्त होणार असे अनेकांना वाटू लागले. मात्र, त्यानंतर रणवीरने दीपिकाने शेअर केलेल्या फोटोवर (Photo) माय क्वीन अशी कमेंट केली होती.
रणवीर सिंह आणि दीपिका घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चेवर आता दीपिका पादुकोणने मोठे विधान केले. मार्कल पॉडकास्टमध्ये पोहचलेल्या दीपिकाने घटस्फोटाच्या चर्चेवर सडेतोड उत्तर दिलंय. यावेळी दीपिका म्हणाली की, मला एक आठवड्यानंतर पाहून रणवीरला खूप जास्त आनंद होईल. कारण रणवीर गेल्या एक आठवड्यापासून एका म्यूझिकल कार्यक्रमात व्यस्त आहे आणि यामुळे आमची भेट झाली नाहीये.
यावेळी दीपिका म्हणाली की, आम्ही दोघंपण कामामुळे एकमेकांपासून दूर आहोत आणि घरीही गेलो नाहीयेत. आमच्या नात्याला आता तब्बल 10 वर्ष झाली आहेत. आम्ही 2012 पासून एकमेकांना डेट करत होतो. त्यामुळे आता आमच्या नात्याला 10 वर्ष झाली आहेत. यापूर्वी घटस्फोट घेण्याच्या अफवांवर रणवीर सिंहने भाष्य केले होते. दीपिकाने देखील घटस्फोटाच्या बातम्या फेक असल्याचे म्हटले आहे.