Deepika Padukone | दीपिका पादुकोण हिचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्का, अभिनेत्री दिसली चेहरा लपवताना

| Updated on: Feb 16, 2023 | 3:04 PM

सध्या दीपिका पादुकोण हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर युजर्स मोठ्या प्रमाणात कमेंट देखील करत आहेत.

Deepika Padukone | दीपिका पादुकोण हिचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्का, अभिनेत्री दिसली चेहरा लपवताना
Follow us on

मुंबई : शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाल केलीये. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खान याच्यासोबत दीपिका पादुकोण ही मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणजे दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. जेंव्हा दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान हे सोबत चित्रपट करतात, त्यावेळी तो चित्रपट नेहमीच बाॅक्स आॅफिसवर धमाल करतो. पठाण या चित्रपटातील बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. चित्रपटातून बेशर्म रंग हे गाणे काढून टाकण्याची मागणीही सातत्याने सोशल मीडियावर केली जात होती. इतकेच नाही तर सोशल मीडियावरही पठाण चित्रपटाच्या विरोधात रोष वाढताना दिसत होता. या वादामध्ये शाहरुख खान किंवा चित्रपटाशी संबंधित कोणत्याच व्यक्तीने भाष्य केले नाही. शाहरुख खान याने आणि चित्रपटाच्या टिमने चित्रपटाचे कुठे प्रमोशनही अजिबात केले नाही. तरीही हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हीट ठरला. पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर शाहरुख खान हा फक्त सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांच्या संपर्कात होता.

सध्या दीपिका पादुकोण हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर युजर्स मोठ्या प्रमाणात कमेंट देखील करत आहेत. दीपिका पादुकोण हिचा हा व्हिडीओ फ्लाइटमधील दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दीपिका पादुकोण ही बिझनेस क्लास सोडून फ्लाइटच्या इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ती वॉशरूमकडे जाताना दिसत आहे.

विशेष म्हणजे दीपिका पादुकोण हिने ओळखू येऊ नये, याकरिता मोठा चश्मा घातला आहे. यादरम्यान कोणालाही बोलणे देखील दीपिका पादुकोण हिने टाळले. ती आपल्या चेहरा लपवताना दिसत होती.

भगव्या रंगाचे ओव्हरसाईज जाकीट दीपिका पादुकोण हिने घातल्याचे दिसत आहे. तसेच डोक्यावर कॅप घातली आहे. दीपिका पादुकोण हिचा हा व्हिडीओ बघितल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे.

एका युजर्सने दीपिका पादुकोण हिच्या या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, पठाण चित्रपटातील फी अजून मिळाली नाहीये का? दुसऱ्याने लिहिले की, इतके वाईट दिवस आले का? बिझनेस क्लास सोडून इकॉनॉमीमधून प्रवास करावा लागतोय? आता दीपिका पादुकोण हिचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.