यशस्वी लोकांना आपल्या आयुष्यात संघर्ष करावा लागतो. ते प्रत्येक प्रसंगातून तापून सुलाखून बाहेर पडतात. ते वाईट काळात संयम ढळू न देता अबाधितपणे काम करत राहतात म्हणून ते यशस्वी होता. अभिनत्री सुष्मिता सेन हिचा एक किस्सा डिजायनर रितू कुमार यांनी शेअर केलाय. हा किस्सा ऐकल्यानंतर सुष्मिता सेन हिच्या यशाचं गुपित आपल्या लक्षात येईल. तिने दिवसरात्र काम केलं. तिने काम करताना झोकून देवून काम केलं. विशेष म्हणजे ती काम करताना बेशुद्धदेखील पडली. पण तिने काम पूर्ण केलं. त्यामुळे असामान्य माणसं खूप सहज मोठे होत नाहीत. त्यामागे त्यांची मेहनतदेखील असते हे तिने दाखवून दिलंय.
सुष्मिता सेन हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. तिने ‘बीवी नंबर 1’, ‘डू नॉट डिस्टर्ब’, ‘मै हूं ना’, ‘मैंने प्यार क्यों किया’, ‘तुमको ना भूल पाएंगे’, ‘नो प्रॉब्लेम’ आणि ‘ताली’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच तिने इंटरनॅशनल एमी नॉमिनेटेडेट सीरीजमध्ये देखील काम केलंय. तिच्या करिअरमधील एका प्रसंगाबद्दल डिजायनर रितू कुमार यांनी महत्त्वाची आठवण शेअर केली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन 1994 मध्ये मिस युनिवर्स बनली होती. त्यावेळी मिस युनिवर्स सुष्मिता सेनचा आयकॉनिक फोटोशूट करण्यात आलं होतं. हे फोटोशूट ताजमहलच्या समोर झालं होतं. डिजायनर रितू कुमार हिने याबाबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. रितू कुमार हिने त्यावेळचा व्हिडीओ शेअर करत आपली आठवण शेअर केली आहे. या व्हिडीओ सोबत रितू यांनी मनमोकळेपणाने त्यावेळी कशाप्रकारे फोटोशूट करण्यात आलं होतं. तसेच यावेळी फोटोशूट करताना सुष्मिता सेन ही बेशुद्ध देखील पडली होती, असे अनेक काही किस्से रितू कुमार यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओसोबत शेअर केले आहेत.
“1993 मध्ये मी स्पर्धकांसाठी कपडे डिजाईन करण्यासाठी मिस इंडियाच्या टीमसोबत डील केली होती. सुष्मिता सेन हिने 1994 मध्ये अमेरिकेत मिस युनिवर्सचा खिताब जिंकला होता. तो एक ऐतिहासिक क्षण होता. त्यामुळे या क्षणाचा एक भाग होण्याचं भाग्य मला मिळालं, याचा मला फार आनंद आहे”, असं रितू कुमार म्हणाल्या आहेत.
“स्पर्धकांसाठी कपडे बनवण्यासाठी माझं काम झालं होतं. तसेच माझ्यावर त्यांचं वॉर्डरोब बनवण्याचंही काम सोपविण्यात आलं होतं. कारण त्यांनी अमेरिकेचा दौरा केला होता. मी त्यांना बांधणी आणि जरदोरी, कुर्ता बनवलेले सूट पाठवायला सुरुवात केली होती, जे त्यांना खूप आवडले होते”, असं रितू कुमार म्हणाल्या आहेत.
रितू कुमारने शूटच्या आधी काय झालं आणि त्यानंतर सुष्मिताने गुलाबी साडीत कसं शूट केलं, याबाबतही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे या शूटच्या वेळी सुष्मिता सेन ही बेशुद्ध झाली होती, अशी माहिती रितू कुमार यांनी दिली. “सुष्मिता जेव्हा टूरनंतर दिल्ली पोहोचली तेव्हा मला कॉल आला की, ताज पॅलेसला या. तिथे पोहोचल्यानंतर मला कळलं की, ताजमहलच्या बाहेर शूट होणार आहे. पण सुष्मितासाठी पाठवलेले जे कपडे होते ते शॉर्ट्स आणि टी-शर्ट होतो. ते कपडे इतके लहान होते की, त्यांना कुठल्या मकबऱ्याच्या बाहेर परिधान करुन जाता येणार नाही. त्यामुळे आम्ही त्याच दिवशी रात्री एक बंद झालेलं दुकान खोलायला भाग पाडलं”, असं रितू कुमार यांनी सांगितलं.
“इथे आम्ही गुलाबी साडीची निवड केली. तसेच लगेच ब्लाउजदेखील तयार करुन घेतलं. आम्हाला इतर काही महत्त्वपूर्ण वस्तूदेखील भेटल्या. त्यानंतर थोड्याच तासांमध्ये आम्ही शूटींगसाठी तयार झालो. यावेळी शूटिंग प्रचंड धावपळीत झालं. या दरम्यान बिचारी सुष्मिता एक वेळा बेशुद्ध देखील पडली. पण फोटो आमच्या मेहनीतीला साजेसे होते”, अशी सविस्तर आठवण रितू कुमार यांनी सांगितली.