मुंबई : जावेद अख्तर (Javed Akhta) आणि वाद हे समीकरण फार पूर्वीपासूनचेच आहे. आता जावेद अख्तर यांनी मुलाखतीदरम्यान केलेल्या एका विधानामुळे ते अडचणीत आले आहेत. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या वाढदिवसानिमित्त जावेद अख्तर यांनी खास मुलाखत (Interview) दिलीये. मात्र, यावेळी त्यांनी जंजीर चित्रपटाबद्दल सांगताना मोठे भाष्य केले असून हे धर्मेंद्र यांनी अजिबातच आवडले नाहीये. यावर थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धर्मेंद्र यांनी जावेद अख्तर यांचा समाचार घेतला.
मुलाखतीदरम्यान जंजीर चित्रपटासंदर्भात बोलताना जावेद अख्तर म्हणाले की, जंजीर चित्रपटाची सर्वात अगोदर आॅफर ही धर्मेंद्र यांना आली होती. मात्र, त्यांनी हा चित्रपट नाकारला आणि तो अमिताभ बच्चन यांना मिळाला. धर्मेंद्र हे जावेद अख्तरच्या याच विधानावर संतापले असून त्यांनी यावर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपला राग व्यक्त केलाय. यामुळे आता अनेक चर्चांना उधाण आलंय.
धर्मेंद्र यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जावेद अख्तर या खोट्या दुनियेत सत्य कसे दडले जाते… जगत राहा.. मनाला गुदगुल्या करा, मोठ्याने बोलण्याची जादू तुला कळली असती…जंजीर चित्रपटासाठी शेवटी अमिताभ बच्चन यांना आॅफर देण्यात आली होती. जंजीर चित्रपटाची स्क्रिप्ट धर्मेंद्र यांना समोर ठेवून लिहिण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव धर्मेंद्र यांनी चित्रपट करण्यास शेवटी नकार दिला. अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात जबरदस्त अभिनय करत हा चित्रपट गाजवला.