मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना पुन्हा एकदा मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्यात त्रास होत आहे. काल (29 जून) रात्री जेव्हा त्यांना पुन्हा एकदा त्रास होऊ लागला तेव्हा कुटुंबियांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले (Dilip Kumar hospitalized due to breathlessness currently in ICU).
98 वर्षीय दिलीप कुमार यांना दहा दिवसांपूर्वी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले होते. फुफ्फुसात पाणी भरल्याच्या त्रासानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुमारे दहा दिवसांच्या उपचारानंतर, जेव्हा त्यांना आराम वाटू लागला, तेव्हा त्यांना घरी सोडण्यात आले होते. अशा परिस्थितीत त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या बातमीमुळे चाहत्यांच्या मनात खूप चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी चाहते सतत प्रार्थना करत आहेत.
यापूर्वीही श्वास घेताना त्रास झाल्याने दिलीपकुमार यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांच्या टीमच्या लक्षात आले होते की, फुफ्फुसात काही संसर्ग झाल्यामुळे दिलीप साहेबांना श्वास घेण्यात त्रास होत आहे. ज्यानंतर त्याच्या फुफ्फुसातील पाणी काढून टाकले गेले आणि बायपास करून फुफ्फुस तंत्राने उपचार केले गेले.
यावेळी सुमारे 350 मिलीलीटर द्रव काढून टाकण्यात आला. ज्यानंतर दिलीप कुमाराला खूप अशक्तपणा जाणवत होता. या उपचारानंतर त्याच्या ऑक्सिजनची पातळी वाढू लागली. समाधान व्यक्त करत डॉक्टरांनी त्यांना 11 जूनला डिस्चार्ज दिला होता.
सायरा बानो यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की दिलीप कुमार यांची प्रकृती आता पूर्वीपेक्षा खूपच खालावली आहे. त्यांची प्रतिकारशक्तीही कमी झाली आहे, ज्यामुळे जास्त चालू शकत नाहीत. त्यांना चालताना नेहमीच आधाराची गरज भासते. (Dilip Kumar Health Update)
“दिलीप कुमार माझ्या हृदयाची धडकन आहेत. त्यांना स्पर्श करणं, त्यांच्याकडे पाहत राहणं हा माझ्यासाठी जगातील सर्वोच्च आनंद आहे. तेच माझा श्वासोच्छ्वास आहेत, मी आजन्म त्यांच्याकडे पाहत राहू शकते. मी आजही त्यांची दृष्ट काढते” असं सायरा बानो यांनी मागे एका मुलाखतीत सांगितलं होतं.
दिलीप कुमार यांच्या दोघा धाकट्या भावांचा गेल्या वर्षी कोरोनाने मृत्यू झाला. 88 वर्षीय अस्लम खान यांचे 21 ऑगस्ट रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. तर बारा दिवसांनीच (चार सप्टेंबर) 92 वर्षांच्या एहसान खान यांची प्राणज्योत मालवली. कोरोना काळात संसर्ग टाळण्यासाठी दिलीप कुमार यांना घरीच आयसोलेट करण्यात आले आहे.
(Dilip Kumar hospitalized due to breathlessness currently in ICU)
बारा दिवसात दोन भाऊ गमावले, दिलीपकुमार यांचे धाकटे बंधू एहसान खान यांचे निधन
दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून ऐतिहासिक इमारतीचा दर्जा