Dilip Kumar Throwback Photos : अमिताभ ते शाहरुख खान, बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांसोबत दिलीप कुमारांचे जवळचे संबंध, पाहा फोटो
दिलीपकुमार यांच्यावर आज सायंकाळी पाच वाजता सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्य दर्शनासाठी अनेक सेलेब्रीटी त्यांच्या घरी जात आहेत.
1 / 7
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी आज (7 जुलै) अखेरचा श्वास घेतला आहे. ते मागील बराच काळापासून आजारी होते.
2 / 7
दिलीपकुमार यांची पत्नी-अभिनेत्री सायरा बानो नेहमीच त्यांच्याबरोबर असतात. दिलीपकुमार यांचा मृतदेह रूग्णालयातून घरी नेत असतांनाही सायरा बानो त्यांच्याबरोबर तेथे उपस्थित होत्या.
3 / 7
दिलीप कुमार आणि शाहरुख खान यांचे खास नाते होते. दिलीप कुमार शाहरुखला आपला मुलगा मानत होते. त्यांना भेटण्यासाठी शाहरुख अनेक वेळा दिलीप साहेबांच्या घरीही गेला आहे.
4 / 7
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी दिलीपकुमार यांचे खास नाते होते. एकदा अटलजींना दु:खी पाहून दिलीप कुमार अस्वस्थ झाले आणि त्यांनी त्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना चांगलेच खडे बोल सुनावले होते.
5 / 7
अमिताभ बच्चन यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत बर्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. दोघांची मैत्री खूप घट्ट होती. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर दिलीपकुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
6 / 7
राजकारणात फारसे सक्रिय नसले तरी, दिलीप कुमार हे राज्यसभेचे खासदार देखील होते.
7 / 7
दिलीपकुमार यांच्यावर आज सायंकाळी पाच वाजता सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्य दर्शनासाठी अनेक सेलेब्रीटी त्यांच्या घरी जात आहेत.