मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ही तिच्या करिअरपेक्षा तिच्या पर्सनल लाईफमुळे कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी दिशाचे नाव आदित्य ठाकरेसोबत जोडले जात होते. इतकेच नाही तर अनेक ठिकाणी आदित्य आणि दिशा स्पाॅट देखील झाले होते. त्यावरून राज्यात राजकारणात बरीच चर्चा देखील रंगली होती. दिशा पटानी ही टायगर श्रॉफला डेट करत होती. मात्र, या दोघांच्या नात्यामध्ये काहीतरी बिनसल असल्याची एक चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.
दिशा आणि टायगरचे चाहते यांना परत एकदासोबत पाहण्यास इच्छुक आहेत. मात्र, सातत्याने त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या पुढे येत आहेत. खरोखरच दिशा आणि टायगरचे ब्रेकअप झाले का हा प्रश्न सातत्याने चाहत्यांकडून विचारला जातोय.
नुकताच दिशाने आपल्या सोशल मीडियावर एका मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे दोघेही प्रचंड आनंदात दिसत आहेत. हा सेल्फी काही वेळातच सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
चाहत्यांना आता हा प्रश्न पडला की, हा व्यक्ती नेमका कोण आहे. इतकेच नव्हे तर या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत दिशावर प्रश्नांचा पाऊस पाडत आहेत.
एका चाहत्याने विचारले की, तू या व्यक्तीमुळेच टायगरला सोडले का? दुसऱ्याने लिहिले की, हा तोच आहे ना? तिसऱ्याने लिहिले की, हा फक्त मित्र आहे की तुझा बॉयफ्रेंड?
या प्रश्नांमध्ये अनेकांनी थेट टायगर जिंदा है…टायगर जिंदा है…अशा प्रकारच्या कमेंट केल्या आहेत. दिशाला या व्यक्तीसोबत पाहून चाहत्यांना अजिबात आनंद झाला नसल्याचे हे कमेंटवरून स्पष्ट दिसत आहे.
दिशा पटानीसोबत असलेली व्यक्ती नेमकी कोण हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. दिशासोबत दिसणारी ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून दिशाचा फिटनेस फ्रीक आहे.
अलेक्जेंडर एलेक्स इलिक असे या व्यक्तीचे नाव आहे. तो फक्त फिटनेस फ्रीक नसून तो एक मॉडल पण आहे. दिशा आणि हा व्यक्ती नेहमीचसोबत स्पाॅट होतात. हे चांगले मित्र असल्याचे सांगितले जात आहे.