मुंबई : प्रियांका चोप्रा ही अशी एक बाॅलिवूड अभिनेत्री आहे, जिची संपूर्ण जगात ओळख आहे. अत्यंत कमी वेळामध्ये प्रियांकाने बाॅलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही एक खास ओळख निर्माण केलीये. आज प्रियांका चोप्रा जागतिक स्तरावर आयकॉन बनली आहे. प्रियांका नेहमीच सामाजिक विषयांवर स्वत: चे मत मांडते. तब्बल 3 वर्षांनंतर काही दिवसांपूर्वी प्रियांका ही भारतामध्ये आली होती. इतकेच नाही तर मुंबई मेरी जान म्हणत तिने काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूडमधील अभिनेत्रींना मिळणाऱ्या फीबद्दल मोठे भाष्य केले आहे. कारण बाॅलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्रींच्या फीबद्दल गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत.
आजही बाॅलिवूडमध्ये एखाद्या अभिनेत्याला चित्रपटासाठी जेवढी फी देण्यात येते. त्या तुलनेत अभिनेत्रीची फी फारच कमी आहे. दोघेही चित्रपटामध्ये समान काम करतात. परंतू अभिनेता आणि अभिनेत्रीला फी कधीच समान मिळत नाही.
आता यावरच प्रियांका चोप्रा बोलताना दिसलीये. प्रियांका म्हणाली की, मला कधीच बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये समान फी मिळाली नाहीये. चित्रपटामधील मुख्य कलाकाराला जेवढी फी मिळते, त्याच्या तुलनेत मला फक्त 10 टक्के मिळालीये.
पुढे प्रियांका म्हणाली की, आजही बाॅलिवूडमधील अनेक महिला याचा सामना करतात. मलाही करावा लागेल जर मी एखाद्या अभिनेत्यासोबत काम करत असेल तर. माझ्यासोबतच्या सर्व अभिनेत्रींनी समान फीची मागणी नक्कीच करायला हवी.
काही काळापूर्वी ही मागणी आम्ही केली पण होती. परंतू आम्हाला समान फी कधी मिळाली नाहीये. म्हणजेच काय तर बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये अभिनेत्याच्या तुलनेत अभिनेत्रींच्या फी फार कमी मिळते.