मुंबई : बॉलिवूडची लाडकी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) पहिल्यांदा आयुष्मान खुरानासोबत (Ayushman Khurana) जंगली पिक्चर्सच्या कॅम्पस कॉमेडी ड्रामा ‘डॉक्टर जी'(Doctor G) मध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे, ज्यामध्ये, शेफाली शाह (Shefali Shah) देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. निर्मात्यांनी नुकतंच चित्रपटातील रकुलचा बहुप्रतीक्षित ‘फर्स्ट लुक’ शेअर केला आहे.
रकुल, आयुष्मान, शेफाली यांना आपल्या व्यक्तीरेखेच्या तयारीचा भाग म्हणून तज्ज्ञांसोबत खास सेशन्स
‘डॉक्टर जी’ या चित्रपटातील डॉक्टर फातिमाची व्यक्तिरेखा सहज वाटण्यासाठी, रकुलला अनुभूति कश्यप दिग्दर्शित या कौटुंबिक मनोरंजकपटासाठी मेडिकल टर्मोनोलॉजी आणि काही महत्वपूर्ण सर्जिकल प्रक्रियांबाबतच्या डेटेलिंग्जचा देखील अभ्यास करावा लागला आहे. ऑपरेशन्स आणि इतर वैद्यकीय जगाशी जोडलेल्या प्रत्येक गोष्टींना स्क्रीनवर प्रामाणिकपणे दाखवण्यासाठी, निर्मात्यांनी रकुल, आयुष्मान, शेफाली यांना आपल्या व्यक्तीरेखेच्या तयारीचा भाग म्हणून प्रशिक्षित करण्यासाठी तज्ज्ञांसोबत खास सेशन्स आयोजित करण्यात आली होती.
रकुल प्रीत सिंहनं व्यक्त केल्या भावना
आपल्या व्यक्तिरेखेविषयी बोलताना रकुल म्हणाली की, ”’डॉक्टर जी’चे चित्रीकरण हा एक सुंदर अनुभव राहिला आहे. यामध्ये मी एका डॉक्टरची भूमिका साकारत असल्यामुळे, यातील व्यवहार आणि काम परफेक्ट असणे आवश्यक होते. स्क्रीनवर वास्तविक दिसण्यासाठी मेडिकलशी निगडित मुख्य गोष्टी जाणून घेणे अनिवार्य होते. डॉक्टर फातिमा बनण्याचा प्रवास ही एक अद्भुत प्रक्रिया होती जी मी नेहमीच माझ्याजवळ जपून ठेवू इच्छिते.”
“आम्हाला फातिमाचे वास्तविक दिसणे आवश्यक वाटत होते. योग्य लुकसाठी आम्ही अनेक लुक टेस्ट केल्या त्यामागे विचार हा होता कि हे यथासंभव वास्तविकतेच्या जवळ जायला हवे आणि व्यक्तिरेखेतील मृदुता समोर आणेल. केवळ डॉक्टरचा एप्रण घालून तुम्हाला अचानक जबाबदारीची जाणीव होऊन जाते, भले ही मी केवळ एक व्यक्तिरेखा साकारत होते. सीन्ससाठी रुग्ण तपासताना, कोणालाही हे सहज समजून येईल की वास्तवात डॉक्टरांच्या खांद्यावर किती जबाबदारी असते आणि त्यांचे जीवन किती कसोटीपूर्ण असते,” ती पुढे म्हणाली.
‘डॉक्टर जी’ एक कॅम्पस कॉमेडी ड्रामा
अनुभूति कश्यप दिग्दर्शित, ‘डॉक्टर जी’ एक कॅम्पस कॉमेडी ड्रामा आहे, ज्याचे सह-लेखक सुमित सक्सेना, विशाल वाघ आणि सौरभ भारत आहेत. निर्मात्यांनी नुकतेच प्रयागराजमध्ये एक व्यापक शूटिंग शेड्यूल पूर्ण केले असून चित्रपट या महिन्याच्या शेवटापर्यंत पूर्ण होणार आहे.
संबंधित बातम्या