मुंबई : अजय देवगण याचा दृश्यम 2 हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करताना दिसत आहे. दृश्यम 2 नंतर अनेक मोठे चित्रपट रिलीज होऊनही दृश्यम 2 चित्रपटाच्या बाॅक्स ऑफिसवर काही फरक पडला नाहीये. दृश्यम 2 रिलीज होऊन सहा आठवडे झालेले असताना देखील चित्रपट ताबडतोब कमाई करतोय. गेल्या काही काळापासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर धमाका करत नसतानाच अजय देवगणच्या चित्रपटाने जबरदस्त कामगिरी केलीये. अजूनही दृश्यम 2 ला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसत आहे.
दृश्यम 2 हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरपासूनच याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. विशेष म्हणजे रिलीजच्या अगोदर जेवढी चित्रपटाची चर्चा होती, त्यापेक्षा जास्त चित्रपट हीट नक्कीच ठरलाय.
बाॅलिवूडचे बिग बजेटचे चित्रपट फ्लाॅप जात असतानाच दृश्यम 2 ने कमाल केलीये. बाॅलिवूडचे फेमस चित्रपट निर्माता रोहित शेट्टी याच्या चित्रपटाला देखील धमाका करण्यात यश मिळाले नसतानाच अजयच्या दृश्यम 2 ने धमाल केलाय.
दृश्यम 2 ला रिलीज होऊन सहा आठवडे झाले आहेत. आता चित्रपटाने 230 कोटींचा आकडा पार केला आहे. विशेष बाब म्हणजे चित्रपट रिलाज होऊन सहाव्या आठवड्यामध्ये चित्रपटाने तब्बल 53 लाखांचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.
अजय देवगण हा दृश्यम 2 नंतर भोला या चित्रपटामध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे अजय देवगण याने भोला या चित्रपटाच्या शूटिंगला देखील सुरूवात केलीये. आता भोला बाॅक्स ऑफिसवर काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.