मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ही तिच्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देते. शिल्पा शेट्टी कायमच सोशल मीडियावर योगा करतानाचे आणि व्यायामाचे व्हिडीओ (Video) शेअर करते. काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टी हिच्या पायाला दुखापत झाली होती, त्यावेळीही ती व्यायाम करताना दिसली होती. अनेकांनी शिल्पा शेट्टी हिचे काैतुकही केले. शिल्पा शेट्टी सध्या बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, शिल्पा सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून कायमच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. बाॅलिवूडमधील पार्ट्यांना देखील शिल्पा शेट्टी हजेरी लावते.
सध्या शिल्पा शेट्टी हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टी ही अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. अनेकांनी शिल्पा शेट्टी हिच्या लूकचे काैतुकही केले आहे. मात्र, शिल्पा शेट्टीचे कपडे पाहून अनेकांना मोठा धक्का देखील बसलाय.
या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे शिल्पा शेट्टी ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलीये. नुकताच शिल्पा शेट्टी ही स्टार-स्टडेड बिग इम्पॅक्ट अवॉर्ड्समध्ये सहभागी झाली होती. त्याचाच एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या अवॉर्ड्समध्ये शिल्पा शेट्टी ब्रेलेस व्हाईट पँटसूटमध्ये दिसली. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
शिल्पा शेट्टी हिच्या या व्हिडीओला आता मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. नेटकऱ्यांना तिचा हा लूक अजिबात आवडला नसून शिल्पा शेट्टी हिची तुलना थेट उर्फी जावेद हिच्यासोबत केली जात असून एका युजर्सने लिहिले की, उर्फी जावेद हिचा प्रभाव तुमच्यावर पडल्याचे दिसत आहे.
दुसऱ्याने लिहिले की, अरे ही तर दुसरी उर्फी जावेद तयार झालीये. आता शिल्पा शेट्टी हिच्या या व्हिडीओला प्रचंड ट्रोल केले जात आहे. शिल्पा शेट्टी ही शेवटी निकम्मा या चित्रपटामध्ये दिसली होती. रोहित शेट्टी याच्या आगामी चित्रपटामध्ये शिल्पा शेट्टी महत्वाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.
शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याचे नाव पॉर्नोग्राफी प्रकरणात आल्यानंतर अभिनेत्रीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रा, शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात शिल्पा शेट्टीच्या पतीचे नाव आल्याने अनेकांनी शिल्पा शेट्टीवर टीका केली होती.