मुंबई : सैफ अली खान याची लेक सारा अली खान (Sara Ali Khan) ही कायमच चर्चेत असते. सारा अली खान ही तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. सारा अली खान ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी सतत सारा अली खान आणि कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू होत्या. विशेष म्हणजे यांचे एकत्र अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, या दोघांनी यांच्या रिलेशनवर कधीच भाष्य केले नाही. एक चर्चा मध्यंतरी सुरू होती की, कार्तिक आर्यन आणि सारा अली खान खास यांचे ब्रेकअप झाल्याची. एक चर्चा आहे की, सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचे ब्रेकअप (Break up) झाले आहे.
सारा अली खान हिचे नाव आता कार्तिक आर्यन याच्यानंतर क्रिकेटर शुभमन गिल याच्यासोबत जोडले जात आहेत. सध्या सोशल मीडियावर सारा अली खान हिचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. सारा अली खान हिचा हा व्हिडीओ विमानतळावरील आहे. हा व्हिडीओ पाहून सारा अली खान हिला जोरदार ट्रोल केले जात आहे.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सारा अली खान ही विमानतळावर स्पाॅट झालीये. मात्र, पापाराझी आणि चाहत्यांना पाहून चक्क सारा अली खान ही पळताना दिसत आहेत. आता व्हिडीओमुळेच सारा अली खान ही ट्रोल होताना दिसत आहे. एकाने म्हटले की, या स्टार किड्सला इतका जास्त भाव देऊ नका यार…कशाला एवढा भाव देता.
Sara Ali Khan. ?? pic.twitter.com/uopV64NZ0G
— ????❤️? (@QHDposts) April 19, 2023
दुसऱ्याने लिहिले की, असे काय झाले हिला विमानतळावर पळायला. हिच्याकडे सर्वांना दुर्लक्ष करा…इतका भाव कशाला. तिसऱ्याने लिहिले की, ही नुसती ओवर अॅक्टिंग करते. काही दिवसांपूर्वी सारा अली खान हिचा गॅसलाइट हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. या चित्रपटाकडून निर्मात्यांना प्रचंड अपेक्षा होत्या.
आशिकी 3 चित्रपटासाठी अनेक अभिनेत्रींचे नाव चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, सारा अली खान हिला आशिकी 3 चित्रपटाची आॅफर मिळालीये. बऱ्याच काळ सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या अफेअरच्या चर्चा सतत रंगताना दिसत होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वी सारा अली खान हिने स्पष्ट केले की, आपल्याला अजून आशिकी 3 चित्रपटाची आॅफर आली नाहीये. मात्र, आशिकी 3 मध्ये काम करायला नक्कीच आवडेल.