मुंबई : बॉलिवूड (Bollywood) दिग्दर्शक मोहित सुरी दिग्दर्शित एक व्हिलन रिटर्न्स हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. मोहित सुरीलाही या चित्रपटाकडून खूप आशा होत्या. मात्र, पहिल्याच दिवशी म्हणावा तसा प्रतिसाद चित्रपटाला अजिबात मिळाला नाहीयं. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’बद्दल सांगायचे तर, या चित्रपटाची (Movie) ओपनिंग फारशी चांगली झाली नाही. एक व्हिलन रिटर्न्स हा मल्टीस्टारर चित्रपट आहे. अब्राहम, अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया एकत्र दिसत आहेत. हा चित्रपट धमाकेदार ओपनिंग (Opening) करेल अशी अपेक्षा सर्वांनाच होती. पण हा चित्रपट काही खास करू शकला नाहीयं.
बॉलिवूच्या इतर चित्रपटांप्रमाणेच ‘एक व्हिलन रिटर्न्स’नेही निराशा केली आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांना हा चित्रपट समजणे सोपे नाही. मात्र, या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने 7 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचे बजेट 80 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. सर्व स्टारकास्टने चित्रपटाचे भरपूर प्रमोशन केले पण बॉक्स ऑफिसवर यश मिळवू शकले नाही. यामुळे आर्श्चय व्यक्त केले जात आहे.
दिग्दर्शक मोहित सुरीचे मागील तीन चित्रपट फ्लॉप झाले आहेत. या तीन चित्रपटांमध्ये मलंग, हाफ गर्लफ्रेंड आणि हमारी अधुरी कहानी ही नावे येतात. 2014 मध्ये आलेला ‘एक व्हिलन हाय’ हा त्याचा शेवटचा हिट चित्रपट होता. मलंग 2020 चित्रपटाने 58.99 कोटी रुपये, हाफ गर्लफ्रेंड 2017 ने 60.30 कोटी रुपये आणि हमारी अधुरी कहानी 2015 ने तिकीट खिडकीवर केवळ 34.43 कोटी रुपये कमावले आहेत.
मोहित सुरीच नाही तर जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर या दोघांचेही चित्रपट फ्लॉप ठरत आहेत. जॉन अब्राहमचे अटॅक पार्ट 1, सत्यमेव जयते, ‘मुंबई सागा’ आणि पागलपंती हे चारही चित्रपट फ्लॉप ठरले. 2019 मध्ये प्रदर्शित झालेला बाटला हाऊस हा त्यांचा शेवटचा हिट चित्रपट होता. एक व्हिलन रिटर्न्स या चित्रपटाच्या सुरुवातीचा दिवस पाहता त्याचा बॉक्स ऑफिसवरचा प्रवास खूपच कठीण जाणार असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे अनेक चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काही खास कमाल दाखू शकले नाहीयंत. आता त्यामध्ये एक व्हिलन रिटर्न्सचाही समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रणवीर कपूरचा बहुचर्चित चित्रपट शमशेराही फ्लाॅप ठरला आहे. चित्रपटाला 100 कोटींचा आकडा गाठणेही खूपच अवघड असल्याचे चित्र दिसत आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 7 कोटींची कमाई केल्याने चित्रपटाचे पुढे काय होणार याचा अंदाज वर्तवला जात आहे.