Election Results 2022: पंजाबमधील काँग्रेसच्या पराभवाला सिद्धू जबाबदार? KRKची राहुल गांधींकडे ‘ही’ तक्रार

| Updated on: Mar 10, 2022 | 2:47 PM

पंजाब विधानसभा निवडणुकांचे (Punjab Election Result 2022) कल हाती आले आहेत. त्यानुसार पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला 91, काँग्रेसला 17, अकाली दलाला 6, भाजपला दोन आणि इतरांना एक जागा मिळताना दिसत आहे.

Election Results 2022: पंजाबमधील काँग्रेसच्या पराभवाला सिद्धू जबाबदार? KRKची राहुल गांधींकडे ही तक्रार
Rahul Gandhi and KRK
Image Credit source: Tv9
Follow us on

पंजाब विधानसभा निवडणुकीत (Election Results 2022) मोठे फेरबदल झाल्याचं पहायला मिळालं. पंजाब विधानसभा निवडणुकांचे (Punjab Election Result 2022) कल हाती आले आहेत. त्यानुसार पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला 91, काँग्रेसला 17, अकाली दलाला 6, भाजपला दोन आणि इतरांना एक जागा मिळताना दिसत आहे. पंजाबचा पराभव हा काँग्रेसला (Congress) जोरदार धक्का समजला जातोय. काँग्रेससोबतच याठिकाणी भाजपचाही सुपडा साफ झाल्याचे दिसत आहे. दिल्लीनंतर पंजाबच्या राजकारणात ‘आप’च्या धमाकेदार पदार्पणाची चर्चा सर्वत्र आहे. नवी दिल्लीमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाने असंतोषाचा लाभ उठवला असून, केजरीवाल यांच्यावर जनतेने विश्वास टाकल्याचे दिसत आहे. या सर्व परिस्थितीत स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खान आपली प्रतिक्रिया देण्यात कसा मागे राहणार?

पंजाबमधील काँग्रेसच्या पराभवाला जबाबदार कोण?

केआरके पाच राज्यांच्या निवडणूक निकालांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. केआरकेने त्याच्या ट्विटमध्ये पंजाबमध्ये काँग्रेसच्या अपयशाचं कारण दिलं आहे. केआरकेनं लिहिलं, ‘प्रिय राहुल गांधी, प्रियंका गांधी तुम्ही सिद्धूला निलंबित केलं असतं तर आज पंजाबमध्ये तुमची ही अवस्था झाली नसती. तुम्ही एकाच वेळी दोन बोटींवर बसण्याचा विचार केला होता, जे नेहमीच धोकादायक असतं.’

विधानसभा निवडणुकीपूर्वी पंजाबच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. काँग्रेस पक्षांतर्गत मोठा राजकीय गोंधळ उडाला होता. नवज्योत सिंग सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात शाब्दिक युद्ध झालं होतं. मुख्यमंत्री खुर्चीवरून दोघं समोरासमोर आले होते.

उत्तरप्रदेशच्या राजकारणावर केआरकेचं मत

केआरकेनं उत्तरप्रदेशमधील राजकीय गोंधळावरही आपलं मत मांडलं. यावेळी उत्तरप्रदेशमध्ये महिला उमेदवारांना जास्त तिकीटं देऊन काँग्रेसने डाव खेळल्याची माहिती आहे. मात्र हा फॉर्म्युलाही काँग्रेसला निवडणुकीत विजय मिळवून देऊ शकला नाही. या मुद्द्यावर केआरकेनं ट्विट करून लिहिलं, ‘समाज महिलांना महत्त्व देत नाही. हे उत्तर प्रदेशात पुन्हा सिद्ध झालं आहं. काँग्रेसने यूपीमध्ये सुमारे दीडशे महिलांना तिकीट दिलं होतं आणि कदाचित दोन-तीन महिलाच निवडणूक जिंकतील. म्हणजे भारतीय समाज हा पुरुषप्रधान आहे आणि पुरुषप्रधानच राहणार!’

‘आप’ला पंजाबमध्ये 91 जागा मिळताना दिसत आहेत. तर सत्ताधारी काँग्रेसला अवघ्या 17 जागा मिळताना दिसत आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत कलह आम आदमी पार्टीच्या पथ्यावर पडताना दिसत आहे. आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली कायम राखताना इतर राज्यातही त्यांनी हातपाय पसरायाल सुरुवात केली. त्यामुळे पंजाबमध्ये आपला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळे आम आदमी पार्टी काँग्रेसला सक्षम पर्याय म्हणून उभा राहताना दिसत आहे.

हेही वाचा:

जे भल्या भल्यांना नाही जमलं ते केजरीवालांनी करुन दाखवलं, काँग्रेसला सक्षम पर्याय उभा राहतोय?

‘प्रस्थापितांना नाकारुन पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला’ मनसे नेते म्हणतात, ‘पर्याय उपलब्ध असतात’