मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawala) आणि इंडस्ट्रीची सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आणि फिल्ममेकर फराह खान (Farah Khan) अलीकडेच ‘झी कॉमेडी शो’मध्ये (Zee Comedy Show) दिसल्या. जुही या वीकेंडला शोची विशेष गेस्ट म्हणून दिसली, तर फराह खान शोमध्ये ‘लाफिंग बुद्धा’ ची भूमिका साकारताना दिसली. दरम्यान, जुही चावलाने तिच्या चित्रपटांच्या सेटवर नृत्यदिग्दर्शक-चित्रपट निर्मात्या फराह खान कशी कानशिलात लावायची. त्यामुळे प्रत्येकजण फराहला कसा घाबरत होता याची आठवण करून दिली.
शोमध्ये जुही म्हणाली, “मी याआधी झी कॉमेडी शो पाहिले आहेत आणि फराहने सर्व कॉमेडियनना खूप प्रेमाने रागवते, पण जेव्हा आम्ही तिच्यासोबत काम करायचो, तेव्हा आम्हाला जवळजवळ दररोज ती कानशिलात लावायची. ” ती पुढे म्हणाली, “कधीकधी ती सेटवर यायची आणि प्रत्येकजण खूप मेहनत आणि तालीम करताना तिचा दिसायचे, पण तिला कदाचित आम्ही काय करत होतो ते आवडत नव्हतं, म्हणून ती संपूर्ण युनिटसमोर माईक घेऊन ओरडायची, ‘काय हे काय आहे? तुम्ही काय करत आहात? ‘आम्ही तिला फार घाबराचो.”
फराहने जुहीच्या डान्सचं केलं कौतुक
जुहीचे शब्द ऐकून सेटवर उपस्थित असलेले सगळे हसायला लागले. त्याच वेळी, जुहीच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देताना फराहनं म्हटलं की, “त्यावेळी ही लोक खरोखरच वाईट डान्स करत होते, ते काहीही करायचे, परंतु आम्ही एकत्र अनेक उत्तम गाणी केली आहेत आणि आम्हाला खूप मजा देखील आली आहे. जुही माझ्या ओळखीच्या सर्वात प्रतिभावान अभिनेत्री आणि नृत्यांगनांपैकी एक आहे आणि तिच्यासोबत काम करताना मला खूप छान वेळ मिळाला. ”
जुही चावला जय मेहताला कशी भेटली?
एवढंच नाही तर शोच्या दरम्यान जूही चावला पती जय मेहतासोबतच्या पहिल्या भेटीबद्दल बोलली. शोमध्ये कॉमेडियन गौरव दुबेनं जुही चावलाच्या ‘हम हैं राही प्यार के’ या चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘मुंबई से गई पूना, पूना से गई दिल्ली, दिल्ली से गई पटना…’ गायलं. या गाण्याच्या दरम्यान गौरव जुहीला विचारतो की जर गुजरात मध्यभागी कुठेच आलं नाही, तर तू आणि जय मेहता कसे भेटले? गौरवच्या या प्रकरणावर, जुही मजेदार पद्धतीने म्हणते की तिला जय चुकून भेटला. जुहीच्या या गोष्टी ऐकून तिथं उपस्थित असलेले सगळेच खळखळून हसले.
पाहा व्हिडीओ
संबंधित बातम्या
Daughter’s Day 2021 : आंतरराष्ट्रीय कन्या दिवस, बापलेकीच्या नात्यावरील हे बॉलिवूड सिनेमे पाहाच