Death | 77 व्या वर्षी या प्रसिद्ध गायिकेने घेतला जगाचा निरोप, नुकताच पद्मभूषण पुरस्काराने केले होते सन्मानित

| Updated on: Feb 04, 2023 | 3:44 PM

काही वर्षांपूर्वी वाणी यांनी आपल्या करिअरचे ५० वर्ष पूर्ण केले होते. विशेष बाब म्हणजे १०,००० हून अधिक गाणी वाणी यांनी संगीत जगताना दिली आहेत.

Death | 77 व्या वर्षी या प्रसिद्ध गायिकेने घेतला जगाचा निरोप, नुकताच पद्मभूषण पुरस्काराने केले होते सन्मानित
Follow us on

मुंबई : मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. पद्मभूषण पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ गायिका वाणी जयराम (Vani Jayaram) यांचे निधन झाले आहे. गायिकेचे निधन (Death) चेन्नईतील त्यांच्या राहत्या घरी झाले. वयाच्या ७७ व्या वर्षी वाणी यांनी जगाचा निरोप घेतलाय. रिपोर्टनुसार वाणी याच्या डोक्याला काही दिवसांपूर्वी मोठी दुखापत (Injury) झाली होती. त्यामुळे त्या सतत आजारी राहत असत. ४ फेब्रुवारीला सकाळी वाणी या त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळल्या. भारत सरकारने पद्मभूषण 2023 पुरस्कार जाहीर केले. या यादीमध्ये वाणी जयराम यांच्या नावाचा देखील समावेश होता.

वाणी जयराम यांनी आपल्या करिअरमध्ये कन्नड, मलाळम, मराठी, भोजपुरी, ओडिया, तेलगू, तामिळ, हिंदी, उर्दू या भाषांमध्ये गाणे म्हटले आहेत.

काही वर्षांपूर्वी वाणी यांनी आपल्या करिअरचे ५० वर्ष पूर्ण केले होते. विशेष बाब म्हणजे १०,००० हून अधिक गाणी वाणी यांनी संगीत जगताना दिली आहेत. संगीत क्षेत्रातील नामवंत संगीतकारांसोबत त्यांनी काम देखील केले आहे.

वाणी जयराम यांच्या निधनाची बातमी ऐकल्यावर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वाणी जयराम यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हीट गाणी गायली आहेत.

आपल्या गायकी कारकिर्दीमध्ये वाणी जयराम यांनी सुंदर आवाज गाण्यांना दिला आहे. संगीत विश्वातील त्यांचे योगदान नेहमीच मोठे राहिले आहे. वाणी जयराम यांच्या निधनाची बातमी कळताच संगीत क्षेत्रामध्ये दु: खाचे वातावरण बघायला मिळत आहे.